गरिबांच्या खात्यात १६ हजार ३९४ कोटी जमा – अर्थमंत्री

आतापर्यंत जनधन खात्यात १० लाख २२५ कोटी रुपये जमा करण्यात आले. विविध योजने अंतर्गत १६ हजार ३९४ कोटींची मदत जमा करण्यात आली आहे. त्याचबरोबर २५ कोटी गरीब, मजुरांना गहु, तांदूळ मोफत वाटप करण्यात आलं, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.

Nirmala Sitharaman hands over keys to 650 home buyers in Mumbai through Khidki Yojana
अर्थमंत्री निर्मला सीतारमण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजबद्दलची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. अर्थमंत्र्यांनी रविवारी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. देशातील गरिबांच्या खात्यात १६ हजार ३९४ कोटी रूपये थेट जमा करण्यात आले असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज रविवारी २० लाख कोटी रूपयांच्या पॅकेजमधून गरिबांना दिल्या जाणाऱ्या मदतीची माहिती दिली. सीतारामन म्हणाल्या, कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आणि गरिबांवर उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये म्हणून सरकारने मागील दोन महिन्यांच्या काळात अनेक उपाययोजना केल्या. गरिबांना, स्थलांतरित मजुरांना मदत देण्याचा प्रयत्न केला. देशातील गरीब, मजुरांना सरकारकडून मदत दिली जात आहे. गरीबांना जेवण दिलं जात आहे. तसंच कॅम्पमध्ये राहणाऱ्या लोकांनाही मदत केली जात आहे. पंतप्रधान गरीब योजनेतंर्गत ही मदत करण्यात आली. तंत्रज्ञानामुळे गरिबांना थेट मदत करता आली. आतापर्यंत जनधन खात्यात १० लाख २२५ कोटी रुपये जमा करण्यात आले. विविध योजने अंतर्गत १६ हजार ३९४ कोटींची मदत जमा करण्यात आली आहे. त्याचबरोबर २५ कोटी गरीब, मजुरांना गहु, तांदूळ मोफत वाटप करण्यात आलं, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात स्थलांतर करणाऱ्या मजुरांची काळजीही सरकारकडून घेण्यात आली. या मजुरांना घरी जाण्यासाठी सरकारने रेल्वे सेवा सुरू केली. त्याचबरोबर त्यांच्या रेल्वे भाड्याचा ८५ टक्के खर्च केंद्रानं उचलला आहे. याशिवाय प्रवासादरम्यान त्यांच्या जेवणाची व्यवस्था सरकारने केली आहे. तसंच अन्न-धान्य दिल्यानंतर त्यासाठी उज्ज्वला गॅसयोजनेतंर्गत मोफत सिलेंडर देण्यात आले,” असं सीतारामन यांनी सांगितलं.


हेही वाचा – अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, ब्लॉक स्तरावर सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा बांधणार


आज पाचव्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, या संकटाच्या काळात आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करत आहोत. पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजद्वारे देशातील लोकांना मदत केली आहे. २५ कोटी मजुरांना अन्नधान्य वाटप केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. यासह नॅशनल सोशल असिस्टंस प्रोग्राम जो वृद्ध, अपंग आणि विधवांसाठी सुरु केला आहे. त्या अंतर्गत २ कोटी ८१ लाख लाभार्थ्यांच्या खात्यात २,८०७ कोटी रुपये आतापर्यंत ट्रान्सफर केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.