घरअर्थजगत1 डिसेंबरपासून बदलणार 'हे' नियम; थेट तुमच्या खिश्यावर होणार परिणाम

1 डिसेंबरपासून बदलणार ‘हे’ नियम; थेट तुमच्या खिश्यावर होणार परिणाम

Subscribe

डिसेंबर महिना सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून काही महत्वाचे नियमही बदलणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिश्यावर होणार आहे. अशा परिस्थितीत हे बदल माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरुन भविष्यात तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. 1 डिसेंबरपासून बदल होणाऱ्या गोष्टींमध्ये पेन्शनधारकांना त्यांचे लाइफ सर्टिफिकेट मिळवणे, सीएनजी, पीएनजी आणि एलपीजीचे दर आणि ट्रेनच्या वेळा यांचा समावेश आहे.

लाईफ सर्टिफिकेटसाठी शेवटची तारीख

सरकारकडून पेन्शन मिळवणाऱ्या लोकांमध्ये तुमचे नाव दिसले तर तुम्हाला 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत लाईफ सर्टिफिकेट जमा करावे लागेल. तुम्ही आजपर्यंत ते केले नसेल तर तुम्ही तुमचे लाईफ सर्टिफिकेट बँकेच्या शाखेत किंवा ऑनलाइन सबमिट करू शकता. त्याच वेळी जर तुम्ही तुमचे लाईफ सर्टिफिकेट जमा केले नसेल, तर तुमचे पेन्शन थांबू शकते.

- Advertisement -

CNG, PNG आणि LPG च्या किमतीत बदल

सीएनजी, पीएनजी आणि एलपीजीच्या किमती सरकार दर महिन्याच्या सुरुवातीला जाहीर करते. गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सीएनजी-पीएनजीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 115 रुपयांनी कमी करण्यात आली होती.

ट्रेनच्या वेळेत बदल

थंडी आणि धुक्यामुळे डिसेंबर महिन्यात रेल्वेने गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. त्याच वेळी डिसेंबर ते फेब्रुवारी-मार्चपर्यंत गाड्या रद्द राहतील. त्याचीही अंमलबजावणी १ डिसेंबरपासून होणार आहे.

- Advertisement -

बँकांना 13 दिवस सुट्टी

ख्रिसमस, वर्षाचा शेवटचा दिवस आणि गुरु गोविंद सिंग यांची जयंती यासारख्या मोठ्या उत्सवांमुळे डिसेंबरमध्ये वर्षाच्या शेवटच्या महिन्यात 13 दिवस बँका बंद राहतील. अशा स्थितीत जर तुम्ही बँकेचे कोणतेही महत्त्वाचे काम बऱ्याच दिवसांपासून पुढे ढकलत असाल तर ते लवकरात लवकर पूर्ण करावी लागणार आहेत.


..अन् मुख्यमंत्र्यांची बहीण बसलेली गाडी चक्क पोलिसांनी क्रेनने उचलली, नेमकं काय घडलं?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -