घरताज्या घडामोडीइतर शहरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल-डिझेल महाग; आज लिटरमागे १४ पैशांची वाढ

इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल-डिझेल महाग; आज लिटरमागे १४ पैशांची वाढ

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या किमंतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज आठवड्याचा दुसरा दिवस आहे, आजही देशभरातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर वाढलेले आहेत. आज मुंबईत पेट्रोलच्या प्रति लिटर दरामागे १४ पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर दिल्ली १६ पैसे, कोलकाता १३ पैसे आणि चेन्नईमध्ये १२ पैशांनी पेट्रोल महाग करण्यात आले आहे. पेट्रोलच्या किमंती वाढण्याचा रविवार पासून आज तिसरा दिवस आहे. पेट्रोलचे दर वाढत असले तरी डिझेलचे दर १७ व्या दिवशी स्थिर आहेत.

इंडियन ऑईलच्या संकेतस्थळानुसा्र, आता भारतातील चार प्रमुख शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमंती खालीलप्रमाणे आहेत.

- Advertisement -

पेट्रोल

मुंबई – ८७.५८ रुपये
चेन्नई – ८३.९९
कोलकाता – ८२.४३
दिल्ली – ८०.९० रुपये

डिझेल

मुंबई – ८०.११
चेन्नई – ७८.८६
कोलकाता – ७७.०६
दिल्ली – ७३.५६

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे भारतात इंधनाचे दर वाढत असल्याचे जाणकारांचे मत आहे. चीन अमेरिकेकडून कच्चे तेल विकत घेत असल्यामुळे बाजारात कच्च्या तेलाच्या दराने उसळी खाल्ली आहे. जुलै महिन्यातही कच्च्या तेलाचे दर चढेच राहिले होते. या महिन्यात ब्रेंट क्रूड ऑईलचे दर ४६ डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचले आहेत.

आता घरी बसूनच जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

आपल्या शहरात आज पेट्रोल-डिझेलचा दर काय आहे, हे तुम्हाला घरातून निघताना जाणून घ्यायचे असेल तर तुम्हा मोबाइलमधून एक मेसेज करावा लागेल. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरवर मेसेज करु शकतात. तर बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 नंबरवर मेसेज पाठवू शकतात. यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे माहिती पाठवली जाईल. तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर एसएमएस करुन दैनंदिन दर जाणून घेऊ शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -