Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश स्वत:ला सिद्ध करण्याऐवजी स्वत:ला शोधा, आनंद महिद्रा यांचा 'त्या' विद्यार्थ्यांना सल्ला

स्वत:ला सिद्ध करण्याऐवजी स्वत:ला शोधा, आनंद महिद्रा यांचा ‘त्या’ विद्यार्थ्यांना सल्ला

Subscribe

नवी दिल्ली : देशात कोचिंग हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजस्थानमधील कोटा येथे मानसिक तणावातून विद्यार्थी आत्महत्या करत असल्याच्या घटना एकामागोमाग एक घडत आहेत. सोशल मीडियावर कायम कोणत्याही घटनांबाबत सतर्क असणारे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. स्वत:ला सिद्ध करण्याऐवजी स्वत:ला शोधा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोटामध्ये आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही वाढत्या आत्महत्येबद्दल चिंता व्यक्त केली. या बातमीने आपण अस्वस्थ झालो आहोत. अनेक उज्ज्वल भवितव्ये अशा पद्धतीने टोकाचे पाऊल उचलत असल्याचे पाहून मला वाईट वाटते. मी शेअर करू शकेन एवढे मोठे ज्ञान माझ्याकडे नाही. पण मी कोटाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एवढेच सांगेन की, जीवनाच्या या टप्प्यावर तुमचे ध्येय स्वतःला सिद्ध करणे नाही तर स्वतःला शोधणे आहे, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

हेही वाचा – हिंमत असेल तर केंद्र सरकारने चीनवर सर्जिकल स्ट्राइक करावे; संजय राऊतांचे आव्हान, काय आहे कारण?

- Advertisement -

परीक्षेत यश न मिळणे हा केवळ आत्मशोधाचा मार्ग आहे. याचा अर्थ तुमची खरी प्रतिभा अन्यत्र कुठेतरी आहे. स्वतःला शोधत राहा आणि प्रवास करत राहा. अखेर एक दिवस तुम्हीच स्वतःला शोधून काढाल आणि तुमच्यातील सर्वोत्तम गोष्टी बाहेर आणाल…, असा आशावादही आनंद महिंद्रा यांनी या विद्यार्थ्यांसमोर ठेवला आहे.
दरवर्षी दोन लाखांहून अधिक विद्यार्थी कोचिंग हब कोटा येथे अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) आणि वैद्यकीय महाविद्यालयांसाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी जातात.

- Advertisment -