घरदेश-विदेशभाजपा नेते मुकुल रॉय यांच्याविरोधात एफआयआर दाखल

भाजपा नेते मुकुल रॉय यांच्याविरोधात एफआयआर दाखल

Subscribe

सत्यजीत बिसवास यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या केल्या प्रकरणी भाजपाचे नेते मुकुल रॉय यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही हत्या भाजपाचे नेते मुकुल रॉय यांनी केली असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष गिरीशंकर दत्ता यांनी केला आहे. त्यानुसार, मुकुल रॉय यांच्यासह चार जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मुकुल रॉय हे पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रभावी नेते आहेत. पश्चिम बंगालमधील भाजपसंबंधित अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये मुकुल रॉय यांचा सहभाग असतो. तसेच, येत्या लोकसभा निवडणुकांची धुरा साभाळण्याची जबाबदारी मुकुल रॉय यांच्यावरच सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. परंतु या हत्या प्रकारणात मुकुल रॉय यांचे नाव पुढे आल्यामुळे विरोधकांच्या हातात आता आयतेच कोलीत मिळाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकारानंतर दोन जणांना अटक केली आहे. तसेच गोळी झाडण्यासाठी जी बंदूक वापरण्यात आली, ती बंदूक पोलिसांच्या हाती आली आहे. पोलिसांच्या तपासानंतर समोर आले की गोळी मागून मारण्यात आली आहे. त्याचसोबत हंसखली पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे.

- Advertisement -

सत्यजीत बिश्वास यांची हत्या

सत्यजीत बिसवास हे नदिया जिल्हयातील कृशनगर मतदारसंघाचे आमदार होते. बिसवास हे फुलबाडी येथे आयोजित सरस्वती पूजेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी पूजा सुरू असतानाच बिसवास यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर त्यांना त्वरीत स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. परंतू त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. तृणमूलमधील काही विश्वासघातकी लोकांनी भाजपच्या या कामासाठी मदत केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने ट्विटरवरून केला आहे. यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणावरून बराच वाद सुरू असल्याचं पाहायला मिळालं.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -