घरदेश-विदेश९ गोळ्या अन् २ शूटर ठार...असदला जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला, पण...वाचा एन्काऊंटरचा...

९ गोळ्या अन् २ शूटर ठार…असदला जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला, पण…वाचा एन्काऊंटरचा संपूर्ण रिपोर्ट

Subscribe

एसटीएफने झाशीतील बडागाव पोलिस ठाण्यात ३ एफआयआर नोंदवले आहेत. याच एन्काउंटरचा संपूर्ण रिपोर्ट देण्यात आला आहे.

उमेश पाल खून प्रकरणात पाच लाखांचे बक्षीस ठेवलेल्या शूटर असद आणि मोहम्मद गुलामचे एन्काऊंटर झाले आहे. या चकमकीप्रकरणी नेमबाज असद आणि मोहम्मद गुलाम यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एसटीएफने झाशीतील बडागाव पोलिस ठाण्यात ३ एफआयआर नोंदवले आहेत. याच एन्काऊंटरचा संपूर्ण रिपोर्ट देण्यात आला आहे.

पहिल्या एफआयआर गुन्हा क्रमांक- 74/23 मध्ये असद आणि गुलाम यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा एफआयआर दाखल करण्यात आला होता. अतिक अहमद यांचा मुलगा असद याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलासंदर्भात आर्म्स अॅक्ट अंतर्गत दुसरा एफआयआर गुन्हा क्रमांक- 75/23 नोंदवण्यात आला. तिसरा एफआयआर गुन्हा क्रमांक- 76/23 मो. गुलाम यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या विदेशी पिस्तूल आणि काडतुसेप्रकरणी नोंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

तिन्ही एफआयआर एसटीएफचे डेप्युटी एसपी नवेंदू सिंग यांनी लिहिले आहेत. तीनही एफआयआरनुसार असद आणि गुलाम यांनी पोलिसांवर गोळीबार केला आणि एसटीएफकडून ९ गोळ्या झाडण्यात आल्या. सीओ नवेंदू सिंग यांनी दोन गोळ्या झाडल्या, सीओ विमल सिंग यांनी एक, इन्स्पेक्टर अनिल सिंग आणि ज्ञानेंद्र राय यांनी प्रत्येकी एक गोळी झाडली.

याशिवाय हेड कॉन्स्टेबल पंकज तिवारी, सुशील कुमार, सुनील कुमार आणि भूपेंद्र यांनी आपल्या पिस्तुलातून एक-एक गोळीबार केला. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की पोलिसांना असद आणि शूटर गुलामची माहिती खबऱ्याकडून मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी झाशीपासून २३ किमी अंतरावर असलेल्या परिछा येथे असद-गुलामला वेढा घातला आणि एन्काऊंटरमध्ये दोघेही मारले गेले.

- Advertisement -

उत्तर प्रदेश पोलिसांनी उमेश पालच्या हत्येतील आरोपी असद अहमद आणि गुलाम यांना जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही बाजूंच्या गोळीबारात ते जखमी झाले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, असंही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. एफआयआरनुसार, उमेश पालच्या हत्येनंतर आरोपी गुड्डू मुस्लिमही झाशीला आला होता. तो झाशी येथील सतीश पांडे यांच्या घरी थांबला होता. १३ एप्रिल रोजी असद आणि गुलाम हे देखील झाशीत असल्याची माहिती एका खबऱ्याकडून मिळाली. यानंतर नाकाबंदी सुरू करण्यात आली. चिरगावच्या बाजूने दुचाकीवरून दोन जण येताना दिसले, त्यांचा दीड किलोमीटरपर्यंत पाठलाग करण्यात आला. त्यानंतर त्याची दुचाकी पुढे पडून तो झुडपात लपला. यानंतर त्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. स्वसंरक्षणार्थ आमच्या पथकानेही गोळीबार केला, असं देखील या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

काही वेळाने दुसऱ्या बाजूने गोळीबाराचा आवाज थांबला, त्यानंतर आम्ही जाऊन पाहिले तर दोघे जखमी झाले आहेत. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. प्रसारमाध्यमांमध्ये फिरत असलेली छायाचित्रे असद आणि गुलाम यांचीच होती. विशेष म्हणजे, बसपाचे माजी आमदार राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येचा आरोपी माफिया अतिक अहमदचा मुलगा असद याला गुरुवारी पोलिसांनी चकमकीत ठार केले. यासोबतच गोळीबार करणारा गुलामही पोलिसांनी मारला. दोघांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

असद झाशीहून मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. उमेश पालचा खून करून तो लखनौला गेला होता. तेथून कानपूर, नंतर मेरठमध्ये सुमारे एक आठवडा राहिला. मेरठहून तो दिल्लीतील संगम विहार येथे गेला. तेथून पुन्हा यूपीला जाऊन झाशी शहरातून मोटारसायकलने मध्यप्रदेशला जात होता. त्याचवेळी पोलिसांनी दोघांचा एन्काऊंटर केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -