दिल्लीत मेट्रो स्टेशनजवळील इमारतीला भीषण आग, 16 जणांचा मृत्यू

आगीमुळे काळ्या धुराचे लोट दूरवरूनही दिसत होते. आग लागलेली ही तीन मजली व्यावसायिक इमारत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि राउटर बनवणाऱ्या कंपनीचे कार्यालय असलेल्या  पहिल्या मजल्यावरून आग लागली. 

पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका इमारतीला शुक्रवारी भीषण आग लागली. या आगीत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली अग्निशमन सेवेला दुपारी ४.४० वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. यानंतर अग्निशमन दलाने तत्काळ तेथे पोहोचून आग विझवण्यास सुरुवात केली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या खिडक्या तोडून लोकांना बाहेर काढले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.

दिल्लीचे अग्निशमन संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळ संध्याकाळी आग लागलेल्या तीन मजली व्यावसायिक इमारतीतून एकूण 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे. तर डीसीपी समीर शर्मा म्हणाले की, 15 अग्निशमन दल घटनास्थळी हजर आहेत. आम्ही आणखी अग्निशमन दलाला पाचारण केले आहे. आग दोन मजल्यांवर असून आम्ही आतापर्यंत 50-60 लोकांना वाचवले आहे. आगीची तीव्रता पाहता आजूबाजूच्या इमारतीही रिकामी करण्यात आल्या आहेत.

आगीमुळे काळ्या धुराचे लोट दूरवरूनही दिसत होते. आग लागलेली ही तीन मजली व्यावसायिक इमारत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि राउटर बनवणाऱ्या कंपनीचे कार्यालय असलेल्या  पहिल्या मजल्यावरून आग लागली.  पोलिसांनी कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतले आहे.