Eco friendly bappa Competition
घर क्रीडा विश्वचषकाआधी ईडन गार्डन स्टेडियममध्ये लागली आग, BCCIची वाढली चिंता

विश्वचषकाआधी ईडन गार्डन स्टेडियममध्ये लागली आग, BCCIची वाढली चिंता

Subscribe

ईडन गार्डन स्टेडियमवर 2023 च्या विश्वचषकातील 6 सामने खेळवले जाणार आहे. याकरिता या स्टेडियमवर नुतनीकरण करण्यात येत आहे. पण हेच काम सुरू असताना या स्टेडियमच्या ड्रेसिंग रूममध्ये काल रात्री अचानक आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

कोलकाता : जगभरातील क्रिकेटप्रेमींना वेध लागले आहे ते विश्वचषक 2023 चे. यासाठी ज्या ज्या स्टेडियमवर विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहे, त्या स्टेडियमची डागडुजी करण्यात येत आहे. भारतातील एक ऐतिहासिक क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळख असलेल्या ईडन गार्डन स्टेडियमवर सुद्धा 2023 च्या विश्वचषकातील 6 सामने खेळवले जाणार आहे. याकरिता या स्टेडियमवर नुतनीकरण करण्यात येत आहे. पण हेच काम सुरू असताना या स्टेडियमच्या ड्रेसिंग रूममध्ये काल रात्री अचानक आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीच्या घटनेमुळे ड्रेसिंग रूममधील सामानाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. (Fire at Eden Gardens Stadium ahead of World Cup)

हेही वाचा – RBI MPC meet : कर्जदारांना दिलासा; रेपो रेट ‘जैसे थे’, आरबीआयचे पतधोरण जाहीर

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, 2023 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ईडन गार्डन या स्टेडियममध्ये नूतनीकरणाचे काम सुरू आहे. बुधवारी (ता. 09 ऑगस्ट) रात्री देखील हे काम सुरू होते. त्याचवेळी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक ड्रेसिंग रूममध्ये आग लागली. आगीची माहिती मिळताच काही वेळातच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर अग्निशमनच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत या ड्रेसिंग रूममधील बरेचसे सामान जळून खाक झाले होते. त्यामुळे आता बीसीसीआयची चिंता वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

तर ही आग ड्रेसिंग रूमच्या फॉल्स सिलिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पण तरी देखील आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याबाबतचा तपास करण्यात येत आहे. या आगीमध्ये क्रिकेटपटूंचे ड्रेसिंग रूममध्ये ठेवण्यात आलेले साहित्य जळून खाक झाले आहे. हे फार मोठे नुकसान नसले तरी आता या ड्रेसिंग रूमचे पुन्हा नुतनीकरण करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

कोलकात्यामध्ये 28 ऑक्टोबर रोजी विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. या मैदानावर दुसऱ्या सेमीफायनलसह एकूण 5 सामने खेळवले जाणार आहेत. त्यासाठी स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम वेगाने करण्यात येत असून, 15 सप्टेंबरपर्यंत हे काम संपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. तसेच, ICCच्या प्रतिनिधींनी नुकतीच स्टेडियमला भेट देऊन कामाची पाहणी केली होती. त्यांनी कामाच्या वेगाबद्दल समाधानही व्यक्त केले होते. पुढील महिन्यात आयसीसीचे प्रतिनिधी पुन्हा या स्टेडियमच्या पाहणीकरिता येणार आहेत. आगीच्या प्रकारामुळे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (CAB) चिंता वाढली आहे. ‘कॅब’चे (CAB)चे सहसचिव देबब्रत दास यांनी आगीच्या चौकशीचे देखील आदेश दिले आहेत.

- Advertisment -