घरताज्या घडामोडीउत्तर मेक्सिकोमधील स्थलांतरितांच्या केंद्राला आग, ४० जणांचा मृत्यू तर ३० जखमी

उत्तर मेक्सिकोमधील स्थलांतरितांच्या केंद्राला आग, ४० जणांचा मृत्यू तर ३० जखमी

Subscribe

उत्तर मेक्सिकोमधील स्थलांतरितांच्या केंद्राला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत ४० जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल सोमवारी रात्री मेक्सिकोतील सिउदाद जुआरेझ या शहरात घडली. येथील स्थलांतरितांच्या केंद्राला आग लागल्यामुळे ४० जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु या घटनेत मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रातील आग विझवण्यासाठी रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदत आणि बचावकार्याला येथे सुरुवात झाली आहे. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

संयुक्त राज्य अमेरिकेत जाणाऱ्या प्रवाशांसाठी सिउदाद जुआरेझ हे एक प्रमुख क्रॉसिंग पॉइंट आहे. येथील केंद्रात आश्रय किंवा स्थलांतरित लोकांना त्यांच्या विनंतीवर निर्णय होईपर्यंत ठेवतात. ज्या केंद्राला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ते केंद्र सुद्दा अशाच पद्धतीचे होते. दरम्यान, या दुर्घटनेचा तपास मेक्सिकोच्या अॅटर्नी जनरल कार्यालयाने सुरू केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘या’ 5 मुद्द्यांमुळे राहुल गांधींना महाराष्ट्रात धोक्याचे ठरू शकते सावरकरांवरील राजकारण; जाणून घ्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -