देशात Fire Boltt Al स्मार्टवॉच होणार लॉन्च, कॉलिंग आणि बॅटरीची मिळणार अफलातून सुविधा

Fire Boltt Alची वैशिष्ये काय?

देशात Fire Boltt Al ने पहिल्यांदाच आर्टिफीशिअल इंटेलिजेन्ससाठी स्मार्टवॉच्या लॉन्चिंगची घोषणा केली आहे. तसेच Fire Boltt Al मध्ये ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध असणार आहे. कॉलिंगसाठी Al चा सपोर्ट देण्यात आला आहे. Fire Boltt AI ला तीन कलरमध्ये सादर करण्यात आलं आहे. ब्लॅक, ब्लू आणि पिंक असे तीन कलर सादर करण्यात आले आहेत. तसेच या घड्याळाची किंमत ४ हजार ९९९ रूपये इतकी आहे.

Fire Boltt Alची वैशिष्ये काय?

फायर बोल्टच्या स्मार्टवॉचला अॅपल सिरी आणि गूगलचा दोन्ही प्रकारे सपोर्ट देण्यात आला आहे. या घड्याळ्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रकारची माहिती सुद्धा भेटू शकते. कॉलिंगसाठी या घड्याळामध्ये माईक आणि स्पीकर सुद्धा लावण्य़ात आले आहेत. तसेच Fire Boltt Al मध्ये अलार्म, हवामानाचा अंदाज, हार्ट रेट ट्रॅकिंग, ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंग आणि ब्लड प्रेशर ट्रॅकिंग अशा प्रकारच्या सुविधा या स्मार्टवॉचच्या माध्यमातून मिळणार आहेत.

Fire Boltt Al मध्ये १.७ इंचाची एचडी डिस्प्ले देण्यात येणार आहे. तसेच त्याचं रिझॉल्यूशन २४०*२८० पिक्सल आहे. यामध्ये १० इन-बिल्ट स्पोर्टस मोड आणि स्ट्रेस मॅनेजमेंटची सिस्टम सुद्धा असणार आहे. वॉटर प्रूफसाठी IP67 ची रेंटिंग मिळणार आहे. तसेच याची बॅटरी १० दिवसांसाठी बॅकअप सुद्धा केली जाऊ शकते.


हेही वाचा: Maharashtra legislative council election: आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा सोडणं ही सन्मानाची बाब – सुनील शिंदे