Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश इंडोनेशियाच्या तुरुंगात भीषण अग्नितांडव! आतापर्यंत ४० लोकांचा होरपळून मृत्यू

इंडोनेशियाच्या तुरुंगात भीषण अग्नितांडव! आतापर्यंत ४० लोकांचा होरपळून मृत्यू

Related Story

- Advertisement -

इंडोनेशियाच्या बॅन्टेन प्रांतातील तुरुंगात लागलेल्या आगीत ४० जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. कायदा आणि मानवाधिकार मंत्रालयाच्या कारागृह विभागाच्या प्रवक्त्या रिका अपारिंती यांनी यासंदर्भातील माहिती दिली असून ही आग कशाने लागले त्याचा शोध घेतला जात आहे. बुधवारी ही आग लागली असून अद्याप तुरूंगात लागलेल्या भीषण आगीनंतर जेल मधील कित्येक लोकांना सुखरूप बाहेर पाडण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तंगेरंग जेल ब्लॉक सी मध्ये ही आग रात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान लागली.

बॅन्टेन प्रांतातील तंगेरंग कारागृहाच्या ब्लॉक सीमध्ये आग लागली. या तुरुंगात कैद्यांची मोठ्याप्रमाणात गर्दी होती. या ब्लॉकमध्ये १२२ कैदी राहण्याची क्षमता आहे, परंतु ठेवलेल्या कैद्यांची संख्या अद्याप निश्चित झालेली नाही. सप्टेंबर महिन्याच्या सरकारी आकडेवारीनुसार, इंडोनेशियाची राजधानी जकार्ताजवळील तंगेरंग कारागृहात दोन हजार पेक्षा जास्त कैदी होते, जे त्याच्या ६०० लोकांच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त असल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास आग लागली आणि यावेळी बहुतेक कैदी कारागृहात झोपले होते. या अपघातात अनेक कैदी गंभीर भाजले आहेत, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या आग आटोक्यात आली असून तंगेरंग जेलचा ब्लॉक सी पूर्णपणे रिकामा करण्यात येत आहे.

- Advertisement -

कायदा आणि मानवाधिकार मंत्रालयाच्या कारागृह विभागाच्या प्रवक्त्या रिका अपारिंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात ड्रगशी संबंधित गुन्ह्यांसाठी कैद्यांना ठेवण्यात आले आहे. तेथील वृत्तवाहिन्यांनी या तुरुंगात लागलेल्या आगीत साधारण ४० जणांचा मृत्यू आणि ८ गंभीर जखमी झाल्याचे वृत्त दिले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.


कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका वाढला

- Advertisement -