धक्कादायक! सोन्याच्या खाणीला लागली आग, 27 मजुरांचा दुर्दैवी अंत

सोन्याच्या खाणीत आग लागल्याने तब्बल 27 मजुरांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. परदेशातील दक्षिणी पेरुच्या एका परिसरात ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे.

fire broke out in a gold mine, 27 laborers lost their lives

सोन्याच्या खाणीत आग लागल्याने तब्बल 27 मजुरांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. (fire broke out in a gold mine, 27 laborers lost their lives) परदेशातील दक्षिणी पेरुच्या एका परिसरात ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. आत्तापर्यंत पेरुमध्ये घडलेल्या घटनांमध्ये ही सर्वाधिक भयावह घटना असल्याचे बोलले जात आहे. ही घटना घडल्यानंतर या खाणीत काम करणाऱ्या घरच्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या ठिकाणी मृतांच्या नातेवाईकांकडून घटनास्थळी एकच आक्रोश करण्यात आला. शॉर्ट सर्किटमुळे या खाणीत आग लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे.

हेही वाचा – MIG-21 Plane Crash : राजस्थानात घरावर लष्कराचे मिग-21 विमान कोसळले, दोघांचा मृत्यू

पब्लिक प्रॉसिक्यूटर गियोवन्नी माटोस यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले की, येथील खाणीत 27 लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. पेरुची राजधानी असलेल्या अरेक्विपा शहरापासून 10 तास लांब असलेल्या कोंडेसुयोस प्रांतातील खाणीत स्फोट झाल्यानंतर ही या ठिकाणी आग लागली. त्यानंतर या आगीने रौद्ररूप धारण केले. खाणीतील लाकडाच्या खांबाने सर्वात आधी पेट घेतल्याने ही आग जास्त पेटल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आपत्ती बचाव दलाने खाणीत येऊन आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

तर काहींचा आगीतील धुरात श्वास कोंडल्याने आणि काही लोकांचा आगीत जळाल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी 2022मध्ये खाणीशी संबंधित एका दुर्घटना घडली होती. त्या घटनेत तब्बल 39 जणांचा मृत्यू झाला होता. तर त्यानंतर आता ही भयावह घटना घडल्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे.

यादरम्यान बचाव पथकाशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले की, आम्हाला अशी जागा बनवावी लागेल जिथे मृत व्यक्ती सुरक्षित असतील, जेणेकरून आम्ही खाणीच्या आत जाऊन मृतदेह बाहेर काढू शकू. यानाक्विहुआचे महापौर जेम्स कॅसक्विनो यांनी अँडिना वृत्तसंस्थेला सांगितले की, बहुतेक खाण कामगारांचा गुदमरून आणि भाजल्याने मृत्यू झाला असावा.