घरताज्या घडामोडीDelhi Fire : दिल्लीतील आझाद मार्केटमध्ये भीषण आग, ५ दुकानं जळून खाक

Delhi Fire : दिल्लीतील आझाद मार्केटमध्ये भीषण आग, ५ दुकानं जळून खाक

Subscribe

दिल्लीतील आझाद मैदानातील मार्केटमध्ये भीषण आग लागली असून ५ दुकानं जळून खाक झाली आहेत. ही आगीमुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच ही घटना पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

ही घटना घडल्यानंतर या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत तीन जणं गंभीर जखमी झाले आहेत. तिघांनाही येथील जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र, जखमी झालेल्या तीन्ही रूग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलिंडरला आग लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे. परंतु यामध्ये ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणानंतर पीएम मोदी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :ST Workers Strike : पवारांच्या घरावरील हल्ला हे राजकीय षडयंत्र – खासदार संजय राऊत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -