घरताज्या घडामोडीयुगांडामध्ये दृष्टिहीन मुलांच्या शाळेला आग; 11 जणांचा मृत्यू, 6 जखमी

युगांडामध्ये दृष्टिहीन मुलांच्या शाळेला आग; 11 जणांचा मृत्यू, 6 जखमी

Subscribe

युगांडा येथे दृष्टिहीन मुलांच्या शाळेत लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी सुरक्षारक्षक दाखल झाले.

युगांडा येथे दृष्टिहीन मुलांच्या शाळेत लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी सुरक्षारक्षक दाखल झाले. त्यानंतर त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रय्तन केले. (Fire Broke Out In Uganda Blind School 11 Children Dead)

अद्याप या आगीचे कारण अस्पष्ट आहे. युगांडामधील मुकोनो जिल्ह्यातील सलमा स्कुल या दृष्टिहीन मुलांसाठीच्या शाळेला अचानकपणे आग लागली. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमींना किसोगा येथील हेरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. याबाबतत युगांडा पोलिसांनी तशी माहिती दिली आहे.

- Advertisement -

या घटनेबाबत युगांडामधील मंत्री काहिंदा ओटाफिरे यांनी अधिक माहिती दिली आहे. मंगळवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश छोटी मुले आहेत. दरम्यान, या आगीची पूर्ण चौकशी केली जाणार असून, या चौकशीनंतर दोषीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.


हेही वाचा – नाशिकचा पारा घसरला; ‘इतके’ झाले आहे तापमान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -