घरताज्या घडामोडीउत्तर प्रदेशमध्ये लग्नस्थळी आग; 5 जणांचा मृत्यू, 7 जखमी

उत्तर प्रदेशमध्ये लग्नस्थळी आग; 5 जणांचा मृत्यू, 7 जखमी

Subscribe

लग्नस्थळी भीषण आग लागल्याचे धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. उत्तर प्रदेशच्या मोरादाबाद मोरादाबाद जिल्ह्यात असलेल्या इमारतीमध्ये लग्नाची तयारी सुरू होती. त्यावेळी अचानक या इमारतीला आग लागली.

लग्नस्थळी भीषण आग लागल्याचे धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. उत्तर प्रदेशच्या मोरादाबाद मोरादाबाद जिल्ह्यात असलेल्या इमारतीमध्ये लग्नाची तयारी सुरू होती. त्यावेळी अचानक या इमारतीला आग लागली. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असून, सात जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. (fire broken in wedding venue at Moradabad Uttar Pradesh 5 dead)

लग्न असलेली इमारत ही तीन मजल्याची होती. या इमारतीला आग लागल्याची माहित मिळाताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे पाच बंब दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी स्थानिकांनीही मदत कार्य करत सात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले.

- Advertisement -

या इमारतीला आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप असष्ट आहे. मात्र शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी मोरादाबादचे न्यायदंडाधिकारी शैलेंद्र कुमार सिंह यांनी अधिक माहिती दिली आहे.

“मोरादाबादमधील तीन मजली इमारतीत आग लागल्याने पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर सात लोक जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य या इमारतीत राहत होते. अग्निशमन दल आगीच्या कारणाचा तपास करत आहे”, असे शैलेंद्र कुमार सिंह यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाणांचा पाहाणी दौरा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -