घरदेश-विदेशगाझियाबाद रेल्वे स्टेशनवर शताब्दी एक्स्प्रेसमध्ये अग्नितांडव; सुदैवाने प्रवासी सुरक्षित

गाझियाबाद रेल्वे स्टेशनवर शताब्दी एक्स्प्रेसमध्ये अग्नितांडव; सुदैवाने प्रवासी सुरक्षित

Subscribe

गाझियाबाद रेल्वे स्टेशन देशातील सर्वात गर्दी असणारे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. दिल्लीहून लखनौला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेस ट्रेनला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. गाझियाबाद रेल्वे स्थानकात उभ्या शताब्दी ट्रेनच्या पार्सल व्हॅनमध्ये आग लागल्यानंतर स्टेशनवर एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. काही तासांच्या अवधीनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून पहाटे ६ वाजून ४१ मिनिटांनी शताब्दी एक्स्प्रेस गाझियाबाद स्थानकावर पोहोचली. यावेळी ट्रेनमधून अचानक आगीचे लोट पसरू लागल्याचे दिसताच अग्निशमन दलाच्या वाहनांना बोलविण्यात आले. त्यानंतर आग लागलेल्या ट्रेनच्या कोचला वेगळे करण्यात आले. सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी ट्रेनला गंतव्यस्थानावर पाठविण्यात आले.

- Advertisement -

शताब्दी एक्स्प्रेसच्या जनरेटर आणि लगेजच्या डब्यात ७ वाजेच्या सुमारास आग लागल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी सुशील कुमार यांनी दिली. ही आग भीषण असल्याने ४ फायर टेंडरच्या सहाय्याने खिडकी फोडून आग विझविण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर शताब्दी एक्स्प्रेसच्या लगेज बोगीला ही भीषण आग कशी लागली याचा तपास सुरू आहे. संबंधित अधिका्यांनी यासंदर्भातील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे गाझियाबाद स्टेशनवर तासाभरापेक्षा जास्त वेळ शताब्दी एक्स्प्रेस थांबली. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर ट्रेन रवाना करण्यात आल्याची माहिती मिळतेय.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -