भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यला आग

कर्नाटकातील कारवार बंदरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी उपलब्ध असलेल्या अग्निशमन यंत्राचा वापर करून आग आटोक्याच आणण्यात आली.

भारतीय नौदलाच्या युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यला आग लागल्याची घटना घडली आहे. या युद्धनौकेला बुधवारी सायंकाळी उशिरा आग लागली. कर्नाटकातील कारवार बंदरात ही घटना घडली. (fire on board navy aircraft carrier ins vikramaditya karwar karnataka)

कर्नाटकातील कारवार बंदरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी उपलब्ध असलेल्या अग्निशमन यंत्राचा वापर करून आग आटोक्याच आणण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, अद्याप या आगीचे कारण अस्पष्ट आहे.

भारतीय नौदलाची सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका, आयएनएस विक्रमादित्य जगातील १० सर्वात मोठ्या विमानवाहू युद्धनौकांमध्ये समाविष्ट आहे. या युद्धनौकेची लांबी २८३.५ मीटर आहे. त्याचं बीम ६१ मीटर आहे. ही एक कीव-श्रेणीतील मॉडिफाईड विमानवाहू युद्धनौका आहे. ही युद्धनौका २०१३ मध्ये भारतीय नौदलात सामील झाला होती.

याची डिस्प्लेसमेंट ४५,४०० टन आहे. या युद्धनौकेवर ३६ लढाऊ विमानं तैनात केली जाऊ शकतात. यामध्ये २६ मिकोयान MiG-29K मल्टी रोल फायटर्स आणि Kamov Ka-31 AEW&C आणि Kamov Ka-28 ASW हेलिकॉप्टर्स सामील आहेत.

अशीच एक घटना ३० मार्च २०२२ रोजी मुंबईत भारतीय नौदलाची युद्धनौका INS त्रिखंडला आग लागली होती. आयएनएस त्रिखंड या युद्धनौकेला संध्याकाळी ५ वाजता आग लागली. नौदलाच्या युद्धनौकेला आग लागताच अलर्ट वॉच कीपर्सने मशिनरी डब्यातील आग आटोक्यात आणली.

आयएनएस त्रिखंड या युद्धनौकेला लागलेल्या आगीत लष्कराचा एकही जवान जखमी झाला नाही, ही दिलासादायक बाब आहे. भारतीय नौदलाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, INS त्रिकंड जहाजावरील आग विझवल्यानंतर जहाजाची सर्व यंत्रणा पुन्हा सक्रिय करण्यात आली.


हेही वाचा – आयसीसीची वनडे क्रमवारी जाहीर; हार्दिकला फायदा तर रोहित, विराट आणि बुमराहचे नुकसान