फटाके फोडायचे नसतात तर अंगावर फेकायचे असतात; इथला पॅटर्नच वेगळा आहे, पाहा VIDEO

firecrackers war in gujrat amreli

दिवाळी आणि फटाके हे एक अतु़ट नाते झाले आहे. विना फटाके दिवाळी साजरीच होत नाही. फटाके फोडल्याशिवाय, दिवाळी साजरी केल्यासारखे अनेकांना वाटत नाही. साधरणत: फटाके हे जमिनीवर फोडतात. पण भारतात एक असे ठिकाण आहे जिथे फटाके जमिनीवर नाही तर अंगावर फोडले जातात.

कोरोना काळात अनेक ठिकाणी फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या गावात कोरोना असो वा आणखीन काही हा खेळ खेळण्याची परंपरा कधी मोडली गेली नाही आहे. यंदा देखील कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग ठेवून जीवघेणा फटाक्यांचा खेळ करण्यात आला. दारूगोळ्याने भरलेले फटाके एकमेकांवर फेकण्याची प्रथा गेल्या १०० वर्षांपासून आहे. ही प्रथा आहे गुजरातच्या अमरेलीमधील सावरकुंडला गावात.

अमरेलीमधील सावरकुंडला गावात इंगोरिया झाडाची फळ काढून ती सुकवून त्यामध्ये दाळूगोळा भरून त्याचे फटाके तयार केले जातात. दिवाळीच्या दिवशी ते एकमेकांवर फेकले जातात. हे फटाके फेकल्यानंतर खूप लांबपर्यंत जातात. कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी पोलिसांचा ज्यादा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असतो. याशिवाय यंदा या खेळावर कोरोनाचे सावट देखील दिसले आहे. लोक रस्त्यावर खेळण्यासाठी उतरले असले तरी ही संख्या कमी आहे.