घरदेश-विदेशइम्रान खानच्या रॅलीत गोळीबार, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली भूमिका

इम्रान खानच्या रॅलीत गोळीबार, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली भूमिका

Subscribe

नवी दिल्ली – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार करण्यात आला होता. यामुळे इम्रान खान यांच्या पायावर गोळी लागली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भर रॅलीत माजी पंतप्रधानांच्या रॅलीत गोळीबार केला जातो ही जागतिक स्तरावरील मोठी घटना आहे. त्यामुळे भारतीय परराष्ट्रा मंत्रालयानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानात घडणाऱ्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार

- Advertisement -

पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्यावर हल्ला झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेवर आम्ही नजर ठेवून आहोत. आगामी काळात घडणाऱ्या घडामोडींवरही आमचे लक्ष असेल,” असे भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले आहेत.

- Advertisement -

पाकिस्तानात तातडीने निवडणुका घ्यावात अशी मागणी तेहरिक ए इन्साफकडून करण्यात येतेय. याच मागणीसाठी लाहोर ते इस्लामाबादपर्यंत ‘हकीकी आझादी मार्च’ नावाने महामोर्चा काढण्यात आला होता. उद्या, ४ नोव्हेंबर रोजी हा मोर्चा इस्लामाबाद येथे पोहचणार होता. मात्र, त्याआधीच वझिराबाद येथील जफर अली खान चौकात इम्रान खान यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्यांच्या पायाला जखम झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -