घरताज्या घडामोडीजामियानंतर आता शाहीनबागमध्ये आंदोलकांवर गोळीबार!

जामियानंतर आता शाहीनबागमध्ये आंदोलकांवर गोळीबार!

Subscribe

जामिया विद्यापीठ परिसरात आंदोलकांवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आता शाहीन बागमधल्या आंदोलकांवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

काही दिवसांपूर्वी जामिया विद्यापीठ परिसरामध्ये नागरिकत्व (सुधारणा) कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जमावावर एका माथेफिरूने गोळीबार केला होता. त्यामध्ये काही विद्यार्थी जखमी देखील झाले होते. या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला असतानाच आता मोठ्या संख्येने आंदोलन करत असलेल्या मुस्लीम महिला जिथे थांबल्या आहेत, त्या शाहीन बागमध्ये देखील एका व्यक्तीने गोळीबार केला आहे. पोलिसांनी लागलीच या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. या तरुणाने गोळी झाडताच पोलिसांनी त्याला तातडीने पकडून आंदोलकांपासून दूर नेलं. जामियामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमवीर आज हा तरूण आल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलून त्याला ताब्यात घेतलं. दरम्यान, या घटनेत कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही.

- Advertisement -

दरम्यान, गोळी चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव कपिल गुज्जर असल्याचं सांगितलं जात असून नोईडाजवळच्या दल्लूपुरा गावचा तो रहिवासी आहे.


हेही वाचा – थोबाडं बंद करा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -