घरदेश-विदेशFiring : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये गोळीबार; पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

Firing : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये गोळीबार; पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये पोलीस आणि गुंडांमध्ये झालेल्या चकमकीत दोन पोलीस अधिकारी जखमी झाले. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चकमकीत एक गुंडही ठार झाला आहे. ही घटना 2 एप्रिल रोजी रात्री 10.35 च्या सुमारास घडली.

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये पोलीस आणि गुंडांमध्ये झालेल्या चकमकीत दोन पोलीस अधिकारी जखमी झाले. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चकमकीत एक गुंडही ठार झाला आहे. ही घटना 2 एप्रिल रोजी रात्री 10.35 च्या सुमारास घडली. (Firing in Jammu and Kashmirs Kathua police officer Deepak Sharma Death )

हेही वाचा – IPL 2024 DC Vs KKR: कोलकाताचा सलग तिसरा विजय, दिल्ली कॅपिटल्सवर 106 धावांनी विजय, नरेन-अंक्रिशचे अर्धशतक

- Advertisement -

पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, एका गुप्त माहितीवर कारवाई करत अधिकाऱ्यांच्या पथकाने कुख्यात गुन्हेगार वासुदेवचा पाठलाग केला त्यानंतर मंगळवारी रात्री 10.30 च्या सुमारास जीएमसीजवळ चकमक झाली. रामगढ पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या खुनाच्या गुन्ह्यात वासुदेव हा मुख्य आरोपी होता. या चकमकीत तो ठार झाला तर त्याचा एक साथीदार जखमी झाला. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दीपक शर्मा यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे, तर पोलीस विशेष अधिकारी अनिल कुमार (40) यांनाही दुखापत झाली आहे. या दोघांना कठुआ येथील जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दीपक शर्मा यांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कठुआ येथील जीएमसी रुग्णालयात नेण्यात आला, तर चकमकीत गुंड वासुदेव ठार झाला असून तर त्याचा एक सहकारी जखमी झाला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024: आनंदराज आंबेडकरांकडून उमेदवारी मागे; वंचितला पाठिंबा देणार

- Advertisement -

लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्याकडून शोक व्यक्त

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी पीएसआय अधिकाऱ्याच्या बलिदानावर शोक व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, कठुआ येथील मोस्ट वाँटेड गुंडाला शौर्याने लढताना आणि ठार मारताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या पीएसआय दीपक शर्मा यांच्या शौर्याला आणि त्यांच्या धैर्याला मी सलाम करतो. त्यांचे सर्वोच्च बलिदान आपल्या हृदयात कायम राहील. शहीद दीपक शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. संपूर्ण देश शहीद कुटुंब आणि जम्मू-काश्मीर यांच्यासोबत एकजुटीने उभा आहे. त्यांचे समर्पण, विविध आव्हाने आणि संकटांशी लढण्याचे धैर्य आम्हाला सतत प्रेरणा देत आहे. आमच्या शहीदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल आणि आम्ही भयमुक्त जम्मू-काश्मीर निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -