घरताज्या घडामोडीफिरोजपूरच्या जीरामध्ये शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीमार; आंदोलकांनी तोडले बॅरिकेड्स

फिरोजपूरच्या जीरामध्ये शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीमार; आंदोलकांनी तोडले बॅरिकेड्स

Subscribe

फिरोजपूरच्या जीरामधील मन्सूर वाला गावातील दारूच्या फॅक्ट्रीबाहेर जमलेल्या शेतकरी संघटनांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी शेतकरी संघटनांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला.

फिरोजपूरच्या जीरामधील मन्सूर वाला गावातील दारूच्या फॅक्ट्रीबाहेर जमलेल्या शेतकरी संघटनांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी शेतकरी संघटनांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले. त्यानंतर संतापलेल्या पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. (firozpur punjab police lathicharge on farmers in zira protesters broke police barricade)

मिळालेल्या माहितीनुसार, फिरोजपूरमधील मालब्रोज दारू कारखान्यासमोर शेतकरी धरणे आंदोलन करत होते. त्यावेळी धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना लख्खा सदन संबोधित करत होते. तसेच, दारुच्या कारखान्याबाहेर अखंड पठण सुरू होते. त्यावेळी मोठ्याप्रमाणात लोकही त्यामध्ये सहभागी होत होते. यावेळी एसएसपी कंवरदीप कौर उपस्थित होत्या.

- Advertisement -

या पठणाच्या पार्श्वभूमीवर एसएसपी कंवरदीप कौर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, दारुच्या कारखान्यासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना हटवले. परंतु, अखंड पाठ सुरू असल्यामुळे येणाऱ्या नागरिकांना थांबवले जात नाही. त्याचवेळी पोलीस शेतकऱ्यांना धक्काबुक्की करून धार्मिक मेळाव्याला पोहोचू देत नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून अफवा पसरवली जात आहे.

दरम्यान, रविवारी मध्यरात्री पोलिसांच्या वाहनांना घेराव घालून कायद्याचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. रविवारी पोलिसांनी आंदोलकांचे तंबू उखडून टाकले आणि सामान हटवले. त्यानंतर दारूच्या कारखान्याकडे जाणाऱ्या लिंक रोड आणि महामार्गाच्या प्रत्येक भागावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

- Advertisement -

जिल्हा प्रशासनाने रविवारी केलेल्या या कारवाईनंतर सोमवारी शेतकरी संघटना आणखी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी २५० जणांवर गुन्हा दाखल केला असून, २७ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच, ४ जणांना अटकही केली आहे.


हेही वाचा – परराष्ट्र मंत्र्यांच्या मुलाच्या संघटनेलाही चीनकडून निधी, पण…, काँग्रेसकडून भूमिका स्पष्ट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -