घरताज्या घडामोडीजगातील पहिल्या कोरोना लसीचे उत्पादन सुरू, दोन आठवड्यात पहिली बॅच तयार होणार

जगातील पहिल्या कोरोना लसीचे उत्पादन सुरू, दोन आठवड्यात पहिली बॅच तयार होणार

Subscribe

जगातील पहिली कोरोना लस रशियाने विकसित केल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी मंगळवारी केला. यासोबत त्यांनी ही लस त्यांच्या मुलीला देण्यात आल्याचे देखील सांगितले. पण घोषणेनंतर अनेक तज्ज्ञांनी रशियांच्या लसीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या रशियन लसीला ‘स्पुटनिक व्ही’ (Sputnik V) असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान या रशियन लस ‘स्पुटनिक व्ही’ची पहिली बॅच दोन आठवड्यांत तयार होणार आहे. रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराश्को यांनी म्हटले की, ‘पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचारी आणि त्यानंतर शिक्षकांना या कोरोना लसीचा डोस दिला जाईल. रशियाची कंपनी सिस्टेमाने लसीचे उत्पादन सुरू केले आहे.’

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वेबासाईटवरील दिलेल्या माहितीनुसार, ‘१ जानेवारी २०२१ पासून लस विक्री करण्यासाठी तयार आहे.’ ज्याला ही लस दिली जाईल त्याच्यावर एका Appद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे हा App लस दिलेल्या लोकांच्या आरोग्यावर नजर ठेवण्यासाठी तयार आहे. जर लस दिलेल्या व्यक्तीचे आरोग्य बिघडले तर त्वरित त्या क्षेत्रातील आरोग्य विभागाला या व्यक्तीची माहिती मिळेल. या लसीचे नाव सॅटेलाईट स्पुटनिकच्या नावावरून दिले आहे. या सॅटेलाईटला सोव्हियत संघाने लाँच केले होते.

- Advertisement -

रशियाच्या लसीबाबत झाला हा खुलासा

रशियन कोरोना लसीची फक्त ३८ लोकांवर चाचणी केली आहे. यानंतर या रशियन लसीला मंजूरी देण्यात आली आहे, असा खुलासा रशियाच्या अधिकृत दस्तऐवजांचा हवाला देत डेली मेल रिपोर्टमध्ये केला आहे.फोंटंका (Fontanka) न्यूज एजन्सीनुसार, रशियाच्या कोरोना लसीचे साइड इफेक्ट्स झाले आहेत. वेदना होणे, सूज येणे, जास्त ताप येणे, असे साइड इफेक्ट्स झाले आहे. त्याचबरोबर कमकुवतपणा येणे, एनर्जी कमी होणे, भूक न लागणे, डोकेदुखी होणे, अतिसार, नाक बंद होणे, घसा खराब होणे आणि नाक वाहणे असे साइड इफेक्ट्सची नोंद केली आहे.


हेही वाचा – Corona : चीनमध्ये आकरित घडलं! ६ महिन्यांनंतर महिला पुन्हा झाली कोरोना पॉझिटिव्ह!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -