Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश लव-जिहादविरोधी कायद्यांतर्गत यूपीत पहिला गुन्हा दाखल

लव-जिहादविरोधी कायद्यांतर्गत यूपीत पहिला गुन्हा दाखल

आरोपी लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेशात जबरदस्तीने धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत रविवारी पहिला गुन्हा दाखल झाला. बरेलीत एका व्यक्तीविरोधात याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

आरोपी लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. धर्मातरबंदी कायद्यांतर्गत हा देशातील पहिलाच गु्न्हा आहे.उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले की, तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. बरेलीस्थित देवरानिया येथील रहिवासी असलेल्या तरुणीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलं की, आरोपी अवैस अहमद याने शिक्षणादरम्यान आपल्या मुलीशी मैत्री केली. आता तो मुलीला धर्मांतर करुन आपल्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत आहे.

- Advertisement -