Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Covid-19 नंतर आता भारतात आणखी जीवघेणा व्हायरस! 'या' ठिकाणी आढळला पहिला रूग्ण

Covid-19 नंतर आता भारतात आणखी जीवघेणा व्हायरस! ‘या’ ठिकाणी आढळला पहिला रूग्ण

Related Story

- Advertisement -

देशात गेल्या दीड वर्षापासून कोरोना व्हायरसच थैमान सुरूच आहे. कोरोनाची दुसरी लाट देशातील लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण बनली आहे. अशा परिस्थितीत आता शास्त्रज्ञांना कोरोनाच्या B.1.617.2 या प्रकारामुळे मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान प्रथम काळ्या बुरशी नंतर पांढरी आणि पिवळ्या बुरशीने देखील कहर केल्याचे पाहायला मिळाले. आधी कोरोनाव्हायरस त्यानंतर ब्लॅक, व्हाईट आणि येलो फंगस याशिवाय कोरोनामुक्त रुग्णांमध्ये उद्भवणाऱ्या इतर आणखी गंभीर समस्या असलेल्या रूग्णांची नोंद होत असताना देशात आणखी एका जीवघेण्या व्हायरसचा पहिला रूग्ण आढळून आला आहे.

कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू असताना आता राजधानी दिल्लीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गाझियाबादमधील रुग्णालयात हर्पिस सिम्प्लेक्स संसर्गाची पहिली घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या मते, कोविडपासून बरे झालेल्या रूग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे हर्पीज सिम्प्लेक्स विषाणूची (Herpes Simplex Virus) शक्यता असते. या रोगावर उपचार करणं खूप महाग आहे, ज्यामुळे या विषाणूने वैज्ञानिकांना सतर्क केले आहे.

…तर कोरोनापेक्षाही जीवघेणा

- Advertisement -

गाझियाबादमधील डॉ. बीपी त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रुग्णाच्या नाकात हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस सापडला आहे. भारतातील हे पहिलंच प्रकरण आहे. हा व्हायरस खूपच जीवघेणा खतरनाख आहे. जर यावर वेळीच उपचार झाले नाही तर कोरोनापेक्षाही जीवघेणा ठरू शकतो. या रुग्णावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनातून बऱ्या झालेल्या ज्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे किंवा त्यांना आधीपासून दुसरा आजार आहे, त्यांना हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरसतचा धोका जास्त आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.


Covid-19 vaccine: अमेरिकेचे अध्यक्ष जो बाइडन ५० कोटी Pfizer लसींचं करणार वाटप!

- Advertisement -