घरCORONA UPDATEFlorona : ओमिक्रॉननंतर 'फ्लोरोना'ची जगभरात धास्ती, नेमकी काय आहेत लक्षणं ?

Florona : ओमिक्रॉननंतर ‘फ्लोरोना’ची जगभरात धास्ती, नेमकी काय आहेत लक्षणं ?

Subscribe

इस्त्राइलमध्ये एका गर्भवती महिलेला या नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे.

जगभरात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे संकट घोंघावत असतानाच आता फ्लोरोना या नव्या आजाराने शिरकाव केला आहे. ‘फ्लोरोना’ हा कोरोना आणि इन्फ्लूएन्झा यांचा दुहेरी संसर्ग आहे. (Florona infection) मात्र या आजाराबाबत सविस्तर माहिती समोर आलेली नाही. इस्त्राइल देशात या व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आहे. इस्त्राइलमध्ये एका गर्भवती महिलेला या नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. (Florona Disease In Israel)

फ्लोरोना म्हणजे काय?

फ्लोरोना’ हा कोरोना आणि इन्फ्लूएन्झा यांचा दुहेरी संसर्ग आहे. त्यामुळे हा कोणता नवीन प्रकार किंवा आजार नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी फ्लू आणि कोरोनाची लागण होते तेव्हा असे होते. यात प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांवर एकाच वेळी या दोन विषाणूंचा हल्ला होतो. ज्यामुळे हा संसर्ग कोरोना संसर्गपेक्षा दुप्पट धोकादायक ठरत आहे. मात्र इस्त्रायली शास्त्रज्ञ अजून तपशील काढण्यासाठी ‘फ्लोरोना’च्या नमुन्याचा अभ्यास करत आहेत.

- Advertisement -

फ्लोरोनाची लक्षणे काय आहेत?

फ्लोरोनाच्या लक्षणांमध्ये ताप, अंगदुखी, खोकला, शिंका येणे, घसा खवखवणे, धाप लागणे, थकवा, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, अतिसार आणि पुरळ (मुलांच्या बाबतीत) यांचा समावेश होतो. यात न्यूमोनिया आणि मायोकार्डिटिस सारखी अनेक लक्षणे उद्धवतात. याशिवाय न्यूमोनियाच्या लक्षणांसह श्वास घेण्यास त्रास झाल्यास आणि योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या मृत्यूचा धोका वाढतोय. (Florona symptoms)

घाबरण्यासारखे काही आहे का?

हा नवीन व्हेरिएंट नसल्यामुळे घाबरण्याची गरज नाही. डेलमिक्रॉन नावाच्या अशाच दुसर्‍या संसर्गाचा अहवाल यापूर्वी आला होता, तोही नवा प्रकार नव्हता. आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आणि ओमिक्रॉन अशा कोरोना व्हेरिएंटची नोंद केली आहे. (Coronavirus in world)

- Advertisement -

.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -