घरCORONA UPDATEदुःखद बातमी; दिल्लीत कोरोनामुळे ३१ वर्षीय पोलिसाचा मृत्यू!

दुःखद बातमी; दिल्लीत कोरोनामुळे ३१ वर्षीय पोलिसाचा मृत्यू!

Subscribe

आत्तापर्यंत दिल्लीत एकूण ३० पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील हा पोलीस दलातील पहिला मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांप्रमाणेच अहोरात्र सेवा देणार्‍या पोलीस दलात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे दिल्लीत ३१ वर्षीय कोरोनाबाधीत कॉन्स्टेबल मृत्यू झाला आहे. बाधित झालेल्या पोलीसांपैकी प्रथमच एका आपल्या सहकार्‍याचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.  कॉन्स्टेबलच्या पश्चात पत्नी आणि तीन वर्षाचा मुलगा आहे.

या कॉन्स्टेबलला ५ मे रोजी अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याच्या सहकार्यांनी त्याला जवळच्या दिप चंद बांधी रूग्णालयात दाखल केलं. यावेळी हॉस्पिटलमध्ये त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणीनंतर हा कॉन्स्टेबल कोरोनाबाधीत असल्याचे स्पष्ट झाले. हा कॉन्स्टेबल मुळचा हरियाणातील रहिवासी आहे. तो दिल्लीतील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता. दिल्ली पोलीसांनी कॉन्स्टेबलच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचार्‍यांना होम क्वारंन्टाईन होण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात अलीपूर पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीसाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते, त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या ११ पोलीसांना होम क्वारंन्टाईन करण्यात आलं होतं.

आत्तापर्यंत दिल्लीत एकूण ३० पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील हा पोलीस दलातील पहिला मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनाबाधीतांची संख्या पाच हजाराच्यावर गेली आहे. तर ६४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र पोलीसांवरही कोरोनाचं सावट

महाराष्ट्रात लॉकडाउनच्या काळात पोलीस दिवसरात्र डोळ्यांत तेल घालून पहारा देत आहेत. स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता पोलीस सेवा बजावत आहेत. त्यातच आता पोलीसांनाही करोनाने गाठले असून राज्यात आतापर्यंत 300 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, चार पोलिसांचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे. काही दिवसांपूर्वीच वय वर्ष 55 वरील पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे.


हे ही वाचा – मुंबई पोलीस दलाला धक्का; आणखी एका पोलीस हवालदाराचा कोरोनाने मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -