Bird Flu Death: दिल्लीत AIIMS मध्ये बर्ड फ्लुमुळे देशातील पहिला मृत्यू

एकीकडे देशात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट असताना देशात H5N1 म्हणजेच, बर्ड फ्लूची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एम्स रूग्णालयात ११ वर्षांच्या चिमुकल्याचा एवियन इन्फ्लूएंजामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णालयातील या चिमुकल्या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या नर्स आणि डॉक्टरांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

असा घडला प्रकार

हरियाणामधील ११ वर्षांच्या या मुलाला २ जुलै रोजी दिल्लीच्या एम्स रूग्णालयात प्रकृती बिघडल्यानंतर उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. यावेळी मुलांवर करण्यात आलेल्या उपचारादरम्यान त्याला बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले. या चिमुकल्याला बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समजताच एनसीडीसीच्या एका पथकाला या गावात तपासणी करता पाठवण्यात आल्याची माहिती मिळतेय.

११ वर्षांच्या चिमुकल्याला एविएन इन्फ्लुएन्जा H5N1 चा संसर्ग झाल्यानंतर या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या रूग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. यंदाच्या वर्षांच्या सुरूवातील देशात कोरोना महामारी सोबत अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा देखील संसर्ग झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, बर्ड फ्लूचा संसर्ग अनेक पक्षांच्या प्रजातींमध्ये वेगाने होत असल्याने त्यामुळे अनेक ठिकाणी बर्ड फ्लूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कित्येक कोंबड्या जीवे मारण्यात आल्या होत्या.

कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं उद्यापासून ‘शेतकरी संसद’; जंतर-मंतरवर आंदोलन

अशी आहेत बर्ड फ्लूची लक्षणं?

  • बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्यावर २ ते ८ दिवसांनी लक्षण दिसण्यास सुरूवात होते
  • बाधित रूग्णाला ताप, खोकला, घशात, उलटी, डोकेदुखी, सांधेदुखी, इनसोमनिया आणि डोळांचे आजार यांसारखी लक्षणं दिसू लागतात
  • मोठ्या व्यक्तींसह लहान मुलांनादेखील सारखी लक्षणं दिसतात.
  • बर्ड फ्लूकडे दुर्लक्ष केल्यास किंवा हा संसर्ग वाढल्यास न्यूमोनिया होण्याची शक्यता असते तर कधी श्वास घेण्यासही अडथळा निर्माण होतो.