Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी गांधीनगरमध्ये उभारलं पहिलं रेल्वे स्थानकावरचं पंचतारांकीत हॉटेल

गांधीनगरमध्ये उभारलं पहिलं रेल्वे स्थानकावरचं पंचतारांकीत हॉटेल

गांधीनगर स्थानकाच्या भिंतीवर गुजरातमधील अनेक महत्त्वाच्या घटनांच्या प्रतिमा पहायला मिळणार

Related Story

- Advertisement -

गुजरातच्या गांधीनगर रेल्वे स्थानकावर एक पंचतारांकित हॉलेल तयार करण्यात आले असून रेल्वे स्थानकात अनेक अत्याश्यक सुविधांची सोय देखील करण्यात आली आहे. (first five star hotel at the railway station in Gandhinagar gujrat) गुजरातच्या गांधीनगर स्थानकातील पंचतारांकित हॉटेल हे रेल्वे स्थानकावर तयार करण्यात आलेले देशातील पहिले हॉटेल आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या पंचतारांकित हॉटेलचे १६ जुलै रोजी उद्घाटन करणार आहेत. जानेवारी २०१७मध्ये गांधीनगर रल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि स्टेशनवर पंचतारांकित हॉटेल बांधण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर आता रेल्वे स्थानक आणि हॉटेल दोन्ही तयार झाले असून स्टेशनवर अनेक अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकात सुंदर लाईट्सची देखील सुविधा करण्यात आल्याचे गुजरात सरकारने म्हटले आहे.


या हॉटेलमधून लोकांना गांधीनगर आणि विधानसभेचा संपूर्ण नजारा पहायला मिळणार आहे. येथून दांडी कुटीर पर्यत पायी चालत देखील जाता येणार आहे. गांधीनगर रेल्वे स्थानकाच्या वरतीच पंततारांकित हॉटेल असल्याने गुजरातमध्ये येणाऱ्या पर्यटकांना राहण्याच्या सुविधांबाबत त्रास होणार नाही. रेल्वे स्थानकातूनच हॉटेलमध्ये जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. ३०० खोल्यांच्या या पंचतारांकित हॉटेलची इमारत ही शहरातील सर्वात उंच इमारत आहे.

गांधीनगर स्थानकात अत्याधुनिक सुविधा 

- Advertisement -

गांधीनगर स्थानकाचा पुर्नविकास करण्यात आल्याने तिथे आता अत्याधुनिक सुविधांचा प्रवासी लाभ घेऊ शकतात. गांधी नगर स्थानकात तयार झालेल्या नव्या इमारतीमध्ये एंट्री गेट, बुकिंग, लिफ्ट एक्सलेटर, बुक स्टॉल, खाण्यापिण्याची दुकाने यासांरख्या अनेक सुविधा मिळणार आहेत. स्थानकाच्या भिंतीवर गुजरातमधील अनेक महत्त्वाच्या घटनांच्या प्रतिमा पहायला मिळणार आहेत. यात अयोद्धेत तयार होणाऱ्या राम मंदिराची प्रतिमा देखील लावण्यात आली आहे. राम मंदिराची प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.


हेही वाचा – RBI ची Mastercard वर कारवाई

- Advertisement -