घरताज्या घडामोडीLockdown: पहिल्यांदा प्रवासी मजुरांनी विमानाने केला प्रवास!

Lockdown: पहिल्यांदा प्रवासी मजुरांनी विमानाने केला प्रवास!

Subscribe

पहिल्यांदा मजुरांसह विमान रांचीला रवाना झाले आहे. यामध्ये १७७ मजूर आहेत.

लॉकडाऊनमध्ये अडकलेले मजूर आपण पायपीट करताना, ट्रकवरून चालताना, ट्रकवरून लटकलेले जाताना किंवा बस-ट्रेनने आपल्या घरी परतत असताना पाहिले असेल. पण पहिल्यांदा मजुरांना घरी परतण्यासाठी विमानाने प्रवास करत आहे. मुंबईतील मजुरांसह विमान रांचीला रवाना झाले आहे. एनजीओच्या मदतीने १७७ मजुरांना विमानतळावरपर्यंत पोहोचवण्यात आले. जेव्हा हे विमान रांचीमध्ये लँड होणार आहे. तेव्हा कामगारमंत्री स्वतः विमानतळावर हजर राहणार आहेत.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे दोन वाजता १७७ मजुरांची रांग लागली होती. सकाळी सहा वाजता मजूर एअर एशिया इंडिया विमान उड्डाण करण्यापूर्वी आले होते. बंगळुरू लॉ स्कूल अल्युमनी असोसिएशनच्या प्रियांका रमन प्रत्येकजण विमानतळावर पोहोचले की नाही याची खात्री करत होत्या.

- Advertisement -

या लॉ स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी काही एनजीओसोबत फक्त मुंबईतील विविध भागातील प्ररप्रांतीय मजुरांना एकत्र केले आणि त्यांच्या विमानाच्या तिकीटांचीही व्यवस्था केली. प्रियांका रमन म्हणाल्या की, आम्हाला रांचीमधील मजूर अडकले आहेत हे माहित होते. त्यामुळे ज्यांना घरी परतायचे होते त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि त्यांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला.

त्या पुढे म्हणाल्या की, जिथे परिवहन संपर्क खराब आहे तिथल्या मजुरांना परत पाठविण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. मग आम्ही ठरवले की, झारखंडमधील लोकांना परत पाठवण्याची व्यवस्था करायची. यासाठी माजी विद्यार्थांनी निधी गोळा केला. त्यामध्ये सर्व मजुरांचा प्रवास खर्च केला.

- Advertisement -

मोठ्या संख्येने मजूर आज विमानाने झारखंडला परतत आहेत. या प्रवासी मजुरांमधील मंजु देवी म्हणाली की, पुन्हा काम सुरू होईल याची शाश्वती नसल्यामुळे आम्ही आमच्या घरी परत जात आहोत. आम्ही आता परत येणार नाही. गेल्या दोन महिन्यांपासून आम्हाला इथे बऱ्याच समास्यांचा सामना करावा लागला आहे.


हेही वाचा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जो बिडेन म्हणाले ‘मूर्ख’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -