घरदेश-विदेशभारतावर राज्य करणाऱ्या युकेला मिळाले भारतीय वंशाचे पंतप्रधान, मोदींकडून ऋषी सुनक यांचे अभिनंदन

भारतावर राज्य करणाऱ्या युकेला मिळाले भारतीय वंशाचे पंतप्रधान, मोदींकडून ऋषी सुनक यांचे अभिनंदन

Subscribe

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान बनले आहेत. त्यांची कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्यानी निवड केली आहे. यामुळे ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच एक भारतीय वंशाचा व्यक्ती पंतप्रधान पदी विराजमान झाला आहे. सर ग्रॅहम ब्रॅडी यांनी त्यांची औपचारिक घोषणा केली आहे. याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषी सुनक यांचे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. (first indian origin prime minister in britain who ruled india for 150 years pm modi narayana murthy anand mahindra wishes uk new pm rishi sunak)

पीएम मोदींनी केले अभिनंदन

पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटले की, “ऋषी सुनक यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तुम्ही ब्रिटनचे पंतप्रधान बनणार आहात, मी जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्यास आणि रोडमॅप 2030 ची अंमलबजावणी करण्यास उत्सुक आहे. ब्रिटिश भारतीयांचा ‘लिव्हिंग ब्रिज’. तुम्हाला दिवाळीच्या विशेष शुभेच्छा. आम्ही ऐतिहासिक संबंधांचे आधुनिक भागीदारीत रूपांतर केले आहे.”

- Advertisement -

ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या सुनक यांची राजवट!

आता ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे राज्य आले आहे. ज्या ब्रिटनने आपल्याला 200 वर्षे गुलाम बनवून ठेवले, ते ब्रिटन आता एक भारतीय चालवणार आहे. ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीने दिवाळीच्या दिवशी ऋषी सुनक यांची नेता म्हणून निवड केली. युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बनणारे ते आशियाई वंशाचे पहिले व्यक्ती देखील आहेत.

- Advertisement -

इन्फोसिसचे संस्थापक आणि ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सासरे एनआर नारायण मूर्ती यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे. एनआर नारायण मूर्ती म्हणाले की, “ऋषी यांचे अभिनंदन. आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि आम्ही त्यांच्या यशासाठी शुभेच्छा देतो. आम्हाला विश्वास आहे की ते युनायटेड किंगडमच्या लोकांसाठी सर्वोत्तम प्रयत्न करतील.

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ऋषी सुनक यांचे अभिनंदन केले आहे. महिंद्रांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या भारताबाबतच्या टिप्पण्यांचा हवाला देत ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतीय लोकांची पातळी आज आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले की, 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रसंगी विन्स्टन चर्चिल यांनी विनोदाने सर्व भारतीय नेत्यांना खालच्या दर्जाचे आणि शक्तीहीन असे वर्णन केले. पण देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ब्रिटनची सूत्रे हाती घेत भारतीय वंशाच्या व्यक्तीने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. जीवन सुंदर आहे.

ऋषी सुनक यांनी पहिल्यांदा 2015 मध्ये वयाच्या 35 व्या वर्षी संसदेची निवडणूक जिंकली होती. अवघ्या सात वर्षांत ते आज पंतप्रधान होणार आहेत. बोरिस जॉन्सन मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेले ऋषी सुनक यांनी पंतप्रधान झाल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे आश्वासन दिले आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुनक, बोरिस जॉन्सन आणि पेनी मॉर्डंट यांचा समावेश होता. जॉन्सन यांनी माघार घेतली, तर पेनी यांना आवश्यक पाठिंबा मिळू शकला नाही. त्यामुळे दोघेही शर्यतीतून बाहेर पडताच ब्रिटनचे पहिले आशियाई पंतप्रधान होण्याचे निश्चित झाले.

ऋषी यांना पक्षातून प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. 45 दिवस पंतप्रधान राहिलेल्या लिझ ट्रस यांच्या जाण्यामुळे भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा पंतप्रधानपदावर दावा होता. ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत सामान्य माणसांवरील महागाईचा ताण कमी करणे हा मोठा अजेंडा बनला होता. अशा परिस्थितीत लिझ ट्रस मोहक आश्वासने देऊन पंतप्रधान झाल्या पण त्यांचा कृती आराखडा फसला. आता सुनक यातून सर्वसामान्यांची कशी सुटका करतात हे पाहावे लागेल. ऋषी सुनक हे मंगळवारपासूनच अधिकृतपणे पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारू शकतात.


फटाक्यांच्या धुराने दिल्लीची हवा बिघडली, आतषबाजीमुळे वायू प्रदूषण वाढले


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -