घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींनी कोणते गाणे गायले? पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारावर युजर्सचा सवाल

पंतप्रधान मोदींनी कोणते गाणे गायले? पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारावर युजर्सचा सवाल

Subscribe

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टने एका निवेदनात म्हटले आहे की, लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार स्थापित करण्यात आला असून राष्ट्र उभारणीत अनुकरणीय योगदानासाठी दरवर्षी एखाद्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी मुंबईत पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावत हा पुरस्कार स्वीकारला आहे. मात्र पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार स्वीकारताच सोशल मीडियावर अनेक युजर्स एक सवाल उपस्थित करत आहेत. पंतप्रधान मोदींना कोणते गाणे गायले, ज्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे? असा सवाल युजर्सकडून विचारला जात आहे. तर काही युजर्स त्यांचे अभिनंदन करत आहे.

वास्तविक हा पुरस्कार लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सुरु करण्यात आला आहे. या वर्षीपासून या पुरस्कारला सुरुवात झाली आहे. संगीत क्षेत्राशी निगडित हा पहिला पुरस्कार पंतप्रधान मोदींना देण्यात आला. हा पुरस्तार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ते म्हणाले की, लता मंगेशकर या माझ्यासाठी मोठ्या बहिणीप्रमाणे होत्या. मला त्यांच्याकडून अपार प्रेम मिळाले. जेव्हा हा पुरस्कार लतादीदींसारख्या मोठ्या बहिणीच्या नावावर असतो, तेव्हा ते त्यांच्या एकतेचे आणि माझ्यावरील प्रेमाचे प्रतीक असते. त्यामुळे ते न स्वीकारणे माझ्यासाठी शक्य नाही.”

- Advertisement -

मात्र आता या पुरस्कारावर सोशल मीडिया यूजर्सकडून तुफान प्रतिक्रिया येत आहेत. इंतेझार (@Intzar29674257) नावाच्या युजर्सने मोदींना पुरस्कार मिळाल्याने विचारले – मोदीजींनी हा पुरस्कार का देण्यात आला त्यांनी असे कोणते गाणे गायले होते? मायकल (@MichaelForIndia) नावाच्या युजर्सने लिहिले की, या पुरस्कारासाठी चुकीची निवड, हा लता मंगेशकर यांचा अपमान आहे”.

तर आणखी तिसरा एक युजर एस मजुमदार (@ASMAzumdar) यांने लिहिले की “लता दीदींच्या पुरस्कारासाठी सर्वात विवेकपूर्ण निवड केल्याबद्दल LDM पुरस्कार सोसायटीचे अभिनंदन आणि पुरस्कारासाठी मोदीजींचे अभिनंदन. लता दीदी केवळ एक अद्वितीय गायिकाच नव्हे तर एक महान राष्ट्रवादी देखील होत्या!

- Advertisement -

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टने एका निवेदनात म्हटले आहे की, लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार स्थापित करण्यात आला असून राष्ट्र उभारणीत अनुकरणीय योगदानासाठी दरवर्षी एखाद्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जाईल. पंतप्रधानांव्यतिरिक्त, अभिनेत्री आशा पारेख आणि जॅकी श्रॉफ यांना “सिनेक्षेत्रातील समर्पित सेवांसाठी” मास्टर दीनानाथ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राहुल देशपांडे यांना भारतीय संगीतासाठी मास्टर दीनानाथ पुरस्कार मिळाला, तर सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार ‘संजय छाया’ या नाटकाला मिळाला.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -