Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी यूपीत भाजपला धक्का, पहिल्या मंत्र्याचा राजीनामा; राजकारणात खळबळ

यूपीत भाजपला धक्का, पहिल्या मंत्र्याचा राजीनामा; राजकारणात खळबळ

Subscribe

योगी सरकारच्या मंत्रिमंडळात मोठी खळबळ उडाली आहे. तीन मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या पहिल्या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. जलसंपदा मंत्री दिनेश खटीक यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे युपीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

दलित असल्याने अधिकाऱ्यांकडून योग्य मान-सन्मान मिळत नसल्याचा गंभीर आरोप दिनेश खटीक यांनी केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राजभवन ला देखील राजीनाम्याची प्रत पाठविल्याचे सांगितलं जात आहे. खटीक हे जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री असून देखील त्यांना बैठकांचे निमंत्रण दिले जात नव्हते. आपल्यासोबत कोणत्याही बैठका घेतल्या जात नाहीत. फक्त गाडी देण्यात आली असून अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खटीक यांनी केला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, खटीक यांनी अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात आतापर्यंत राज्यमंत्री म्हणून कोणतेही काम मिळाले नसल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मी दिलेल्या कोणत्याही आदेशावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच विभागाच्या योजनांची माहिती देखील देण्यात येत नाही, असे आरोप खटीक यांच्याकडून करण्यात आले आहेत. मात्र, पक्षाकडून खटीक यांच्या राजीनाम्याबाबत अद्यापही कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे अमित शाह आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा : कानुनी लोचा तयार झालाय, छगन भुजबळांची प्रतिक्रिया


- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -