घरताज्या घडामोडीMonkey B Virus: चीनमध्ये मंकीपॉक्सच्या पहिल्या रूग्णाचा मृत्यू, अमेरिकेतही रूग्ण आढळला

Monkey B Virus: चीनमध्ये मंकीपॉक्सच्या पहिल्या रूग्णाचा मृत्यू, अमेरिकेतही रूग्ण आढळला

Subscribe

चीनमध्ये मंकी बी व्हायरसमुळे (Monkey B Virus (BV) मुळे एका ५३ वर्षीय व्यक्तीच्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. पोटदुखी तसेच उलट्या यासारखी लक्षणे या रूग्णामध्ये आढळली होती. चीनमध्ये एका संशोधनाच्या संस्थेत ही व्यक्ती कार्यरत होती. याआधी मार्च महिन्यात दोन मृत माकडांचे शवविच्छेदन केल्यानंतर या व्यक्तीला मंकी व्हायरसची लागण झाली होती, अशी बातमी ग्लोबल टाईम्सने दिली आहे. अनेक हॉस्पिटल्समध्ये उपचार करूनही ही व्यक्ती २७ मे रोजी मृत पावल्याची घटना समोर आली आहे. चीनमध्ये मंकी व्हायरसने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे याबाबतची माहिती आता समोर आली आहे.

नेमका काय आहे मंकी व्हायरस ? लक्षण काय ?

याआधी मंकी व्हायरसने चीनमध्ये कोणत्याच व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती नाही. तसेच संशोधनादरम्यानही अशा प्रकारचा कोणताही व्हायरस आढळला नव्हता. याआधी १९३२ मध्ये अशा प्रकारच्या व्हायरसच्या आढळल्याची माहिती आहे. चीनच्या सेंटर फॉर डिझिज कंट्रोल एण्ड प्रिव्हेन्शनच्या माहितीनुसार माकडामधील पॅथोजेन्स हे मानवासारखेच आढळले आहे. या मंकी व्हायरसची लक्षणे म्हणजे ताप, थंडी वाजणे, सांधेदुखी आणि अशक्तपणा येणे. हा व्हायरस संसर्गजन्य असा आहे. महत्वाचे म्हणजे या व्हायरसच्या संसर्गामुळे मृत्यूचा धोका हा ७० टक्के ते ८० टक्के इतका आहे. संशोधन यासारख्या क्षेत्रात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या व्हायरसची सहज लागण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळेच चीनमधील प्रयोगशाळांमध्ये अशा व्हायरसच्या नियंत्रणासाठी अधिक काटेकोर नियमावली आणि सुरक्षा बळकटीचे आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisement -

अमेरिकेतही मंकीपॉक्सचा रूग्ण

याआधी मंकीपॉक्सच्या रूग्णांचा कहर २००३ मध्ये पहायला मिळाला होता. पण आता २०२१ मध्ये टेक्सासच्या एका व्यक्तीला चिकनपॉक्सचे संक्रमण झाल्याची माहिती समोर आली आहे. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एण्ड प्रिवेन्शनने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. नायजेरियातून अमेरिकेत प्रवास करून दाखल झालेल्या एका महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या २० वर्षांमध्ये हे पहिलेच प्रकरण समोर आले आहे. याआधी १९७० साली दक्षिण आफ्रिकेत या मंकी व्हायरसने कहर केला होता. अमेरिकेच्या सीडीसीच्या दाव्यानुसार हा व्हायरस जास्त लोकांना संक्रमित करणार नाही. या व्यक्तीच्या संपर्कातील सर्व नागरिकांचा शोध सध्या अमेरिकन यंत्रणांमार्फत सुरू आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -