Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश भोपाळमध्ये INDIA आघाडीची ऑक्टोबरमध्ये पहिली जाहीर सभा; आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय

भोपाळमध्ये INDIA आघाडीची ऑक्टोबरमध्ये पहिली जाहीर सभा; आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय

Subscribe

नवी दिल्ली : विरोधी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ (INDIA) आघाडीच्या 14 सदस्यीय समन्वय समितीची पहिली बैठक (First meeting of coordination committee) आज नवी दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी पार पडली. बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल पत्रकार परिषदेत सांगितले की, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ‘इंडिया’ आघाडीची पहिली जाहीर सभा भोपाळमध्ये होणार आहे. (First Public Meeting of INDIA Alliance in Bhopal in October Many important decisions in todays meeting)

केसी वेणुगोपाल म्हणाले की, समन्वय समितीच्या बैठकीत जागा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. घटक पक्षांशी चर्चा करून जागा समन्वयाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. देशाच्या विविध भागात जाहीर सभा घेण्याचे ठरले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये पहिली जाहीर सभा होणार असून त्यात महागाई, बेरोजगारी आणि भाजपा सरकारचा भ्रष्टाचार या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. विरोधी पक्षांनी जात जनगणनेचा मुद्दा पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तुम्ही ‘इंडिया’चे नेतृत्व कराल? श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या प्रश्नावर ममता बॅनर्जींचे उत्तर, म्हणाल्या…

काँग्रेसचे संघटनेचे सरचिटणीस म्हणाले की, विरोधी आघाडीच्या काही कार्यक्रमांवर वृत्तवाहिन्यांच्या अँकरनी बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या प्रसारमाध्यमांशी संबंधित कार्यगटानेही ठरवले आहे की, काही अँकरच्या कार्यक्रमांना विरोधी आघाडीतील घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार नाहीत. अभिषेक बॅनर्जी या बैठकीला उपस्थित नसल्याबद्दल विचारले असता त्यांनी आरोप केले की, भाजपाच्या सूडाच्या राजकारणाचा भाग म्हणून मोदी सरकारने अभिषेक बॅनर्जी यांना समन्स बजावले आहेत.

- Advertisement -

एनडीएचा सामना करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना

दरम्यान, पुढील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) सामना करण्यासाठी दोन डझनहून अधिक विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली आहे. नुकत्याच झालेल्या मुंबईत झालेल्या ‘इंडिया’च्या घटक पक्षांच्या बैठकीत युतीच्या भविष्यातील कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यासाठी 14 सदस्यीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. समन्वय समिती विरोधी आघाडीची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था म्हणून काम करेल.

हेही वाचा – जुमलेबाज भाजपाला असा जुमला दाखवा की…; नाना पटोलेंचा हल्लाबोल

जूनमध्ये पार पडली पहिली बैठक

या वर्षी जूनमध्ये पाटणा येथे ‘इंडिया’ आघाडीची पहिली बैठक पार पडली. पहिल्याच बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक जागेवरून सर्वात मजबूत उमेदवार निवडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईत झालेल्या विरोधी आघाडीच्या तिसर्‍या बैठकीनंतर 1 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या ठरावात असे म्हटले होते की, सर्व पक्ष एकजुटीने निवडणुका लढतील आणि विविध राज्यांतील जागा वाटपाचे काम तातडीने सुरू होईल आणि लवकरात लवकर ते पूर्णही होईल.

समन्वय समितीच्या बैठकीत उपस्थित नेते

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी पार पडलेल्या सन्वय समितीच्या बैठकीत शरद पवार यांच्याशिवाय काँग्रेसचे केसी वेणुगोपाल, द्रमुकचे टीआर बाळू, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, जनता दल (युनायटेड)चे संजय झा, आम आदमी पक्षाचे राघव चढ्ढा, शिवसेनेचे (यूबीटी) संजय राऊत, राष्ट्रीय परिषदेला उपस्थित होते. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) चे ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) चे डी. राजा आणि समाजवादी पक्षाचे जावेद अली खान आदी उपस्थित होते. या बैठकीला काँग्रेस नेते गुरदीप सप्पलही उपस्थित होते.

हेही वाचा – ब्रिटिश पंतप्रधानांनी दिली उद्धव ठाकरेंबाबतची महत्त्वाची माहिती, मुख्यमंत्री शिंदेंचे गंभीर आरोप

तीन पक्षांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित नव्हते

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे या बैठकीला ते उपस्थित नसल्याचे समजते. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहिल्याने या बैठकीला तेही उपस्थित राहू शकले नाहीत. याशिवाय या समितीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अद्याप आपला प्रतिनिधी निवडलेला नाही. 16-17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पॉलिटब्युरोच्या बैठकीत समन्वय समितीमध्ये पक्षाचा प्रतिनिधी कोण असेल याचा निर्णय घेतला जाईल, असे सीपीआय(एम) सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे पक्षाचाचा नेता उपस्थित नव्हता.

- Advertisment -