Homeदेश-विदेशRajiv Kumar on Musk : आधी टीका करतात आणि मग कौतुकांचे पूल...

Rajiv Kumar on Musk : आधी टीका करतात आणि मग कौतुकांचे पूल बांधतात…निवडणूक आयुक्तांची टीका

Subscribe

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेत दिल्लीतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्याचवेळी वारंवार ईव्हीएम वरून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची चोख उत्तरे देखील दिली आहेत.

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेत दिल्लीतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्याचवेळी वारंवार ईव्हीएम वरून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची चोख उत्तरे देखील दिली आहेत. (first they question evm then praise it election commissioner jibe at elon musk)

ईव्हीएम कोणत्याही प्रकारे हॅक होऊ शकत नाही, या आपल्या बोलण्याचा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पुनरुच्चार केला. तसेच हे सांगताना अमेरिकन अब्जाधीश एलन मस्क यांच्यावरही टीका केली.

गेल्या मे महिन्यात भारतातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त असलेल्या एलन मस्क यांनी ईव्हीएमवर टीका केली होती. ईव्हीएम हॅक होऊ शकते असे सांगतानाच आपल्याला त्यावर अजिबात विश्वास नसल्याचे ते म्हणाले. याबाबत राजीव कुमार म्हणाले की, जी व्यक्ती ईव्हीएमबाबत तक्रार करते आहे, त्यांच्या देशातच ईव्हीएमचा वापर केला जात नाही.

हेही वाचा – Delhi Election 2025 : दिल्लीत 5 फेब्रुवारीला होणार मतदान तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी

ईव्हीएमबाबत नेहमीच चुकीचा नरेटिव्ह सांगितला जातो. आयटी क्षेत्रातील एक जागतिक तज्ज्ञ आहेत. त्यांनी देखील ईव्हीएम हॅक होते, असे सांगितले. अरे पण जिथे ईव्हीएम नाही, तेथीलच लोक हे का सांगतात, अशी विचारणा कुमार यांनी केली. त्यांच्याकडे जी यंत्रणा आहे, तिला इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मेकॅनिझम म्हणतात. ते ईव्हीएम नाही. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन असते जे मत रेकॉर्ड करते. त्यानंतरही ईव्हीएम हॅक होऊ शकते, अशी ओरड झाल्याचे राजीव कुमार म्हणाले. एवढी सगळी ओरड झाल्यावर हे तज्ज्ञ काय सांगतात तर, आमचा एक – दीड महिना मतमोजणीतच निघून जातो. भारतात तर एका दिवसात मतमोजणी होते.

लोकांना एखादी गोष्ट सातत्याने सांगितली की आणि जे त्यांना सोयीचे वाटते, त्यावरच लोक लगेच विश्वास ठेवत असल्याचे, राजीव कुमार सांगतात. अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकांपूर्वी व्होटिंग मशीनने निवडणुका घेण्यात गोंधळ होत असल्याचे उद्योगपती एलन मस्क यांनी म्हटले होते. यामुळेच मतपत्रिकांवर निवडणूक घेण्याची त्यांची मागणी होती. मस्क यांचे म्हणणे होते की, मी स्वतः तंत्रज्ञानाशी संबंधित आहे, त्यामुळेच मी कॉम्प्युटर प्रोग्रॅमवर जास्त विश्वास ठेवू शकत नाही. ते हॅक करणे सोपे असते. मात्र, असे म्हणणाऱ्या एलन मस्क यांनी नंतर मात्र, भारतातील मतगणनेची तारीफ केली होती.

हेही वाचा – Rajiv Kumar : ईव्हीएम हॅक होऊच शकत नाही; विरोधकांच्या आरोपाला निवडणूक आयुक्तांचे प्रत्युत्तर