घरदेश-विदेशइतिहासात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी गाऊन न घालता केली सुनावणी

इतिहासात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी गाऊन न घालता केली सुनावणी

Subscribe

कोरोनामुळे न्यायपालिकेच्या कामाच्या पद्धतीसह ड्रेस कोड बदलण्यात आला आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर न्यायपालिकेत प्रथमच असा बदल करण्यात आला आहे.

कोरोना महामारीमुळे न्यायपालिकेला काम करण्याच्या पद्धतीसह ड्रेस कोड बदलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासामध्ये बुधवारी एक नवीन अध्याय जोडला गेला, जेव्हा न्यायाधीशांनी प्रथमच जॅकेट, कोट आणि गाऊन न घालता सुनावणी केली. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे म्हणाले की, कोरोना संकट असेपर्यंत नवीन ड्रेस कोडचा वापर करण्यात येईल. सायंकाळी उशिरा वकील आणि न्यायाधीशांना नवीन ड्रेस कार्ड देण्यात आले.

पुरुष पांढरा शर्ट आणि बँड घालू शकतात तर स्त्रिया पांढरी साडी/सूट आणि बँड घालू शकतात

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या संदर्भात बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी होती. सरन्यायाधीश बोबडे आणि सहकारी न्यायाधीश न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांनी फक्त जॅकेट, कोट आणि गाऊन न घालता केवळ पांढर्‍या शर्ट आणि गळ्याचा बँड घातला होता. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी त्यांना विचारलं की पीठाने गाऊन का घातला नाही? यावर सरन्यायाधीश म्हणाले की कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्यांनी डॉक्टरांचा अभिप्राय मागितला होता. त्यांच्या मते, जड आणि पसरलेल्या कपड्यांद्वारे हा विषाणू सहज पसरतो. हे लक्षात घेता, आम्ही केवळ पांढरा शर्ट आणि बँड परिधान करून सुनावणी करत आहोत. आम्ही वकिलांसाठी देखील याचा विचार करत आहोत.

- Advertisement -

यानंतर सॉलिसिटर जनरल तुषार मेहतासुद्धा दुसर्‍या सुनावणीदरम्यान पांढरा शर्ट आणि बँड परिधान केलेले दिसले. सायंकाळी उशिरा जारी केलेल्या परिपत्रकानुसार पुरुष वकील पांढरा शर्ट आणि बँड घालू शकतात तर महिला पांढरी साडी / सूट आणि बँड घालू शकतात.


हेही वाचा – आर्थिक पॅकेजबद्दल अभिनंदन, पण माझ्याकडूनही पैसे घ्या – विजय मल्ल्या

- Advertisement -

स्वातंत्र्यानंतर न्यायपालिकेत प्रथमच असा बदल

देशाच्या स्वातंत्र्यानंतर न्यायपालिकेत प्रथमच असा बदल करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी. एस. चौहान यांच्या म्हणण्यानुसार घटनेत अशी तरतूद आहे की ड्रेस कोडमध्ये शिथिलता कठिण परिस्थितीत किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करता येते.

अधिकारी, कर्मचा्यांना एप्रिलमध्येच ड्रेस कोडमधून दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही आपल्या कर्मचार्‍यांना आणि अधिकाऱ्यांना ड्रेस कोडमधून दिलासा मिळाला आहे. २४ एप्रिल रोजी जारी केलेल्या अंतर्गत परिपत्रकात असं म्हटले आहे की तज्ञांचे मत आहे की कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परिधान केलेले कपडे दररोज धुवावेत. दररोज कोट-टाय घालणे शक्य नाही. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचारी कोट-टायशिवाय ड्युटीवर येतील.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -