घरताज्या घडामोडीभारतीय राजकारणातील सुंदर आणि बुद्धिमान महिला नेत्या

भारतीय राजकारणातील सुंदर आणि बुद्धिमान महिला नेत्या

Subscribe

भारतीय राजकारणातील सुंदर आणि बुद्धिमान महिला नेत्या.

जागतिक सौंदर्य स्पर्धेत अनेक देशातील सौंदर्यवती सहभाग घेतात. यामध्ये भारत देशाचा देखील तितकाच समावेश असतो. भारताने आजपर्यंत सहा वेळा मिस वर्ल्ड किताब जिंकला आहे. मात्र, भारतातील तरुणी केवळ ऐवढ्यावरच थांबलेल्या नसून आता अशा काही सुंदर आणि बुद्धिमान महिला आहेत, ज्या राजकारणातही आहेत. चला तर जाणून घेऊया भारतीय राजकारणातील सुंदर आणि बुद्धिमान महिला नेत्या.

नुसरत जहाँ

नुसरत जहाँ बंगाली चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. या केवळ अभिनेत्रीच नाहीतर त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. नुसरत जहाँ यांनी बसीरहाट लोकसभा जागेवरुन निवडणूक लढविली होती. त्यांनी भाजपाचे नेते सायंतन बसू यांचा साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता.

- Advertisement -

दिव्या स्पंदना

अतिशय सुंदर असलेली अभिनेत्री दिव्या स्पंदना हिला चित्रपट जगतात राम्या या नावाने ओळखले जाते. ही दक्षिण भारतमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने कन्नड चित्रपटासह तामिळ आणि तेलगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. राम्याने २०१३ मध्ये भारतीय काँग्रेसचे सदस्य म्हणून कर्नाटकातील मांड्या मतदारसंघाच्या पोटनिवडणूक लढवत राजकारणात पाय ठेवला.

- Advertisement -

अलका लांबा

अलका लांबा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तसेच वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी काँग्रेस विद्यार्थी संघ एनएसयूआयमध्ये तिने पदार्पण केले. तरूणांच्या सबलीकरणाच्या उद्देशाने त्यांनी ‘गो इंडिया फाउंडेशन’ची सुरुवाती केली. काही काळाने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्या आम आदमी पक्षात दाखल झाल्या.

अंगुरलता डेका

अंगुरलता डेका अभिनेत्या असून त्या राजकारणातील एक प्रसिद्ध नेत्या म्हणून देखील ओळखल्या जातात. त्यांनी बंगाली चित्रपटात काम केले आहे. त्या २०१६ पासून आसाममधील बटरोबा मदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

डिंपल यादव

अत्यंत साध्या आणि नेहमीच साड्यांमध्ये दिसणाऱ्या डिंपल यादव यांची एक वेगळीच ओळख आहे. त्या देखण्या आणि ग्लॅमरस अशा राजकारणी म्हणून ओळखल्या जातात. कन्नौज येथून दोनदा समाजवादी पक्षाच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. तर त्यांचे पती अखिलेश यादव आणि सासरे मुलायम सिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आहेत.


हेही वाचा – बाबा का ढाबाने उघडलं नवं रेस्टॉरंट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -