घरताज्या घडामोडीपंजाब बॉर्डवर BSF जवानांनी पाच पाकिस्तानी घुसखोरांचा केला खात्मा!

पंजाब बॉर्डवर BSF जवानांनी पाच पाकिस्तानी घुसखोरांचा केला खात्मा!

Subscribe

देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह सुरू असताना दुसऱ्या बाजूला पंजाबला लागून असलेल्या पाकिस्तानी सीमेवरील घुसखोरीचा मोठा डाव हाणून पाडला. बीएसएफच्या जवानांनी पाच घुसखोरांचा खात्मा केला आहे. शनिवार पहाटे ही मोठी कारवाई करण्यात आली.

बीएसएफच्या १०३ बटालियनच्या जवानांनी पंजाबच्या (भारत-पाकिस्तान सीमेजवळ) तरन तारनसह आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करणार्‍या घुसखोरांच्या संशयास्पद हालचाली पाहिल्या. थांबायला सांगितले असता त्यांनी बीएसएफच्या जवानांवर गोळीबार केला. याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये ५ घुसखोरांचा खात्मा करण्यात आला, अशी माहिती बीएसएफने दिली आहे. या घुसखोरांकडून एक बॅग आणि एके ४७ रायफली जप्त करण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

आज सकाळी दिल्ली पोलिसांनी देखील मोठी कारवाई केली. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि अतिरेक्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. यानंतर पोलिसांनी ISIS च्या एका अतिरेक्याला अटक केली आहे. अतिरेक्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच देशावर येणारे विघ्न पोलीस आणि बीएसएफच्या जवानांनी रोखून धरले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – चीनला झटका, भारताने ४४ ट्रेनची निविदा केली रद्द


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -