काश्मिरमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी रविवारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून आज तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. मात्र यामध्ये एक जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. कुपवाडामध्ये रविवारी भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. नियंत्रण रेषेजवळ भारतीय जवानांना पाच अतिरेक्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. तर या चकमकीत एक जवान शहीद झाल्याची प्राथिमिक माहिती समोर आली आहे.
Jammu & Kashmir: 3 more terrorists killed today, total 5 terrorists killed so far by security forces after an infiltration bid was foiled by security forces in Kupwara’s Tangdhar sector yesterday. One security personnel has lost his life during action. Search operation underway.
— ANI (@ANI) September 24, 2018
नेमके काय घडले?
कुपवाडातील तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून काही दहशतवादी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडत असल्याची बाब जवानांच्या लक्षात आली. दरम्यान, घुसखोरी करणाऱ्या दहशवाद्यांनी भारतीय जवानांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. भारतीय जवानांनी देखील त्यांना प्रत्युत्तर देत गोळीबार करण्यास सुरुवात केली. भारतीय जवानांच्या गोळीबारात रविवारी दोन तर आज तीन दहशतवाद्यांनी जागीच मारले गेले तर अन्य दहशवाद्यांनी या ठिकाणाहून पळ काढत पाकच्या हद्दीत पसार झाले. या चकमकीत एक जवान शहीद झाले आहेत. दरम्यान नियंत्रण रेषेच्या परिसरात भारतीय लष्कराने युद्धपातळीवर शोधमोहिम करण्याचे हाती घेतले. यामध्ये पुलवामामध्येही जैश-ए-मोहम्मदचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी जहिद मलिकचा खात्मा करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.