घरदेश-विदेशनागदेवतेचा आशीर्वाद घेण्याच्या अंधश्रद्धेत गमावले पाच महिन्याचे बाळ

नागदेवतेचा आशीर्वाद घेण्याच्या अंधश्रद्धेत गमावले पाच महिन्याचे बाळ

Subscribe

नागदेवतेचा आशीर्वाद घेण्याच्या अंधश्रद्धेपायी एका कुटुंबाने गमावले आपले पाच महिन्याचे बाळ.

सध्या समाज कितीही सुधारलेला म्हणत असलो तरी देखील काही जणांच्या मनात अजूनही अंधश्रद्धेच भूत असल्याचे पाहायला मिळत आहे. छत्तीसगडच्या राजनंदगाव जिल्ह्यात अंधश्रद्धेचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागदेवतेचा आशीर्वाद घेण्याच्या अंधश्रद्धेपायी एका कुटुंबाने आपले पाच महिन्याचे बाळ नागदेवतेच्या समोर ठेवले आणि घात झाला. आपल्या मुलीला नागदेवतेचा आशीर्वाद मिळावा याकरता एका कुटुंबाने आपले बाळ नागदेवतेच्या समोर ठेवले आणि त्यात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नेमके काय घडले?

छत्तीसगडच्या राजनंदगाव जिल्ह्यात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरासमोर एक गारुडी आला. बिल्लू राम मारकाम असे या गारुडीचे नाव आहे. हा गारुडी एका घरासमोर उभा राहिला. गारुडीला पाहून घरातील महिला बाहेर आली असता या गारुडीने महिलेला सांगितले की, तुमच्या पाच महिन्याच्या बाळाला कोबऱ्याचा आशीर्वाद मिळायला हवा. त्या गारुड्याच्या म्हणण्यानुसार, महिलेने आपले पाच महिन्याचे बाळ आजारी असल्याने त्या बाळाला बरे वाटावे याकरता गारुडीकडे दिले. कोबऱ्याचा आशीर्वाद मिळाल्याने बाळ बरे होईल असे त्यांनी बाळाच्या आई-वडिलांना सांगितले. त्यानुसार गारुडीने त्या बाळाला नागदेवतेचा आशीर्वाद मिळावा यासाठी नागदेवतेच्या समोर ठेवले. नागदेवतेने क्षणांचाही विलंब न लावता त्या बाळाला दंश केला.

- Advertisement -

दोन तास विधी चालू ठेवला

सापाचे विष अंगात भिनतेय हे ठाऊक असतानाही त्या गारुड्याने हे विष नाही आहे, असे सांगून तब्बल दोन तास विधी चालू ठेवला. त्यानंतर मुलीचा श्वासोश्वास हळूहळू कमी कमी होत गेला. हे पाहून बाळाच्या आई-वडिलांनी बाळाला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याला खूप उशीर झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अखेरीस या मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी गारुडी बिल्लूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वाचा – पुण्याच्या शिरुमध्ये अंधश्रद्धेचा थरार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -