तामिळनाडूच्या कालकुरिचीमधील फटाक्यांच्या दुकानात अग्नितांडव; ५ जणांचा मृत्यू

Five people killed in fire at a firecracker shop in Sankarapuram town of Kallakurichi district of Tamil Nadu
तामिळनाडूच्या कालकुरिचीमधील फटाक्यांच्या दुकानात अग्नितांडव; ५ जणांचा मृत्यू

तामिळनाडूमधील एका फटाक्याच्या दुकानात भीषण आग लागली. या भीषण आगीत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर लोकं जळाल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडूतील कालकुरिची जिल्ह्यातील शंकरापुरम शहरात ही घटना घडली. या दुर्घटनेत जे जखमी झाले आहेत, त्यामधील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. या फटाक्यांच्या दुकानांतील अग्नितांडवात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना नुकसान भरपाई तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. (Five people killed in fire at a firecracker shop in Sankarapuram town of Kallakurichi district of Tamil Nadu)

कालकुरिची जिल्ह्याचे कलेक्टर पीएम श्रीधर यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, अग्निशमन दलाचे कर्मचारी या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. दुकानासमोर एक मोटार सायकल उभी होती, ती देखील या आगीत खाक झाली आहे. या दृघटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान फटक्यांच्या दुकानांना आग लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. फटक्यांच्या दुकाना व्यतिरिक्त गोदाम आणि मॅनुफॅक्चरिंग युनिटांमध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात विरुद्धनगर जिल्ह्यातील थयालीपट्टीमध्ये फटाके बनवणाऱ्या एका मॅनुफॅक्चरिंग युनिटमध्ये आग लागली होती. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला होता, तर ७ जण जखमी झाले होते. तर जून महिन्यात याच भागात एका अवैध फटाक्यांच्या फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट झाला होता. यात २ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीमध्ये आग लागल्यामुळे ७ जणांचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा – हवामान बदलामुळे भारताला ६५ हजार कोटींचा फटका