घरताज्या घडामोडीCoronaVirus: पाच वैमानिकांना कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वी गेले होते चीनला!

CoronaVirus: पाच वैमानिकांना कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वी गेले होते चीनला!

Subscribe

कोरोनाचा फटका आता एअर इंडियातील वैमानिकांना देखील बसला आहे. एअर इंडियाच्या पाच वैमानिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. उड्डाण करण्याच्या अगोदर ७२ तासांपूर्वी केलेल्या तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले आहे. हे सर्व वैमानिक मुंबईत असून कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्यांना वैद्यकीय देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे. एअर इंडियाच्या सुत्रांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी हे वैमानिक चीन गेले होते.

सध्या परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी ‘वंदे भारत मिशन’ ही मोहीम सुरू आहे. यादरम्यान हे वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. एअर इंडियाचे वैमानिक या लॉकडाऊन दरम्यान अनेक प्रदेशातील लोकांना अत्यावश्यक सामान आणि औषधे पोहोचवण्याचे काम करत आहे.

- Advertisement -

‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणले जात आहे. गेल्या २४ तासांत ८०० हून अधिक भारतीय मायदेशी परतले आहेत.

७ मे ते १३ मेपर्यंत एअर इंडियाची ६४ विमाने आणि त्याची सहाय्यक एअर इंडिया एक्स्प्रेस १२ देशांमधील अडकलेल्या भारतीयांना परत आणले जाणार आहे. ‘वंदे भारत मिशन’मध्ये एअर इंडियाची विमाने महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे.  एकूण ६४ विमानांपैकी यूएईत १०, कतारमध्ये २ , सौदी अरेबिया ५,  ब्रिटनमध्ये ७, सिंगापूरमध्ये ५, अमेरिकेमध्ये ७ , फिलिपाईन्स ५, बांग्लादेश ७, बहारीनमध्ये २, मलेशियात ७, कुवैतमध्ये ५, ओमानमध्ये ४ विमाने उड्डाण करणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ऑपरेशन समुद्र सेतू – मालदिवमध्ये अडकलेले ६९८ भारतीय मायदेशी परतले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -