Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Coronavirus: कोरोनामुळे मे महिन्यात Air Indiaच्या ५ वैमानिकांचा मृत्यू

Coronavirus: कोरोनामुळे मे महिन्यात Air Indiaच्या ५ वैमानिकांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जोरदार लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहीमेत एअर इंडियाच्या विमानांची मदत घेतली जात आहे. देशातील विविध भागांमध्ये लस पुरवठा करण्यासाठी एअर इंडियाची विमान दिवस रात्र काम करत आहेत. पण दिवसरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाने काही सोडले नाही आहे. एअर इंडियाच्या ५ अनुभवी आणि वरिष्ठ वैमानिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील लसीकरण मोहिमेवर परिणाम पडत आहे.

एअर इंडियाच्या अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन प्रसाद कर्माकर, कॅप्टर संदीप राणा, कॅप्टन अमितेश प्रसाद, कॅप्टन जीपीएस गिली आणि कॅप्टर हर्ष तिवारी यांचा मे महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाला. ३७ वर्षीय तिवारी यांचा ३० मेला मृत्यू झाला. ते Boeing 777 aircraft चे पहिले अधिकारी होते.

- Advertisement -

दरम्यान एअर इंडियाच्या वैमानिकांनी अनेक वेळा क्रू मेंबर्स आणि त्यांच्या कुटुंबियासाठी लस देण्याची मागणी वारंवार केली आहे. परंतु त्याची मागणी आतापर्यंत पूर्ण झाली नाही आहे. जर त्याची ही मागणी पूर्ण झाली नाहीतर एअरलाईन बंद करून अशी धमकी वैमानिकांनी ४ मेला दिली होती. पण लसीकरणाची तीन शिबीर यामुळे बंद केली कारण लस उपलब्ध नव्हता. यानंतर १५ मेला पुन्हा शिबीर लावले गेले. एअर इंडियाने पहिल्यांदा ४५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यास प्राधान्य दिले.

मंगळवारी Indian Commercial Pilots’ Association (ICPA) ने एअर इंडियाचे संचालक आर एस संधू यांचा पत्र लिहिले. त्यामध्ये लिहिले होते की, ‘वैमानिकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत, वैमानिका क्वारंटाईन केले जात आहे आणि काही वैमानिकांचा मृत्यू होत आहे. ही स्थिती गंभीर धोक्याचे संकेत देत आहेत. एवढेच नाही तर आपले कुटुंब देखील कोरोनाचा शिकार होत आहे. वंदे भारत मिशन अंतर्गत चालविण्यात येणारी उड्डाणे सुरक्षितपणे परत करून आम्ही जेव्हा घरी परतो, तेव्हा कोरोनाचा सर्वाधिक धोका कुटुंबाला असतो. अशा कठीण परिस्थितीत कुटुंबाला सुरक्षित ठेण्यासाठी कंपनीची गरज आहे, जेणेकरून आम्ही आमचे काम सुरळीत पार पाडू शकू. त्यामुळे आमची सुरक्षा प्राथमिक आधारावर सुनिश्चित केली पाहिजे.’


- Advertisement -

हेही वाचा – Unemployment crisis: कोरोनामुळे जगभरात बेरोजगारीचे संकट वाढणार; UNचा इशारा


 

- Advertisement -