Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी काळाचा घाला! घरात वाढदिवसानिमित्त भाऊ केक कापण्याच्या तयारीत असतानाच बिबट्याचा हल्ला, बहिणीला...

काळाचा घाला! घरात वाढदिवसानिमित्त भाऊ केक कापण्याच्या तयारीत असतानाच बिबट्याचा हल्ला, बहिणीला नेले पळवून

Related Story

- Advertisement -

एका ५ वर्षांच्या चिमुरडी मीर अद्दाला घरातून बिबट्याने पळवून नेल्याची घटना जम्मू काश्मीरमध्ये घडल्याची समोर आली आहे. या घटनेच्या पूर्वी अद्दा आपल्या भावाचा वाढदिवसाचा केक कापण्याच्या तयारित होती. अद्दाने बार्बीचा ड्रेस घातला होता आणि डोक्यावर क्राउन ठेवले होते. ती आपल्या नातेवाईकांना भावाचा केक कापण्यासाठी बोलवत होती. पण काही वेळात काळाचा घाला झाला. लॉनमध्ये उभ्या असलेल्या अद्दाला बिबट्या पळवून घेऊन गेला.

नक्की काय घडले?

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील ओमपुरा भागातील आहे. अद्दा सर्वजण प्रेमाने अद्दा राणी बोलवत असे. घटनेनंतर आनंदीदायी वातावरणात अचानक दुखाचा डोंगर कोसळला. अद्दाचे काका एजाज अहमद याने सांगितले की, ‘काही दिवसांपूर्वी अद्दा आपल्या आजीच्या घराकडून आपल्या ७ वर्षीय भावाच्या वाढदिवसासाठी परतली होती. ती तयार होऊन गार्डनमध्ये पोहोचली होती. तिने आपल्या वडिलांना चहा पिऊन लवकर खाली येणाऱ्यासाठी सांगितले होते.’

- Advertisement -

पण काही वेळातच ही घटना घडली. अद्दाचे नातेवाईक जेव्हा तिच्या शोधासाठी गेले तेव्हा रक्ताचे ठसे आणि एक बाहुली सापडली. अद्दाकडे घटनेदरम्यान ही बाहुली होती. ३ जूननंतर दुसऱ्या दिवशी नातेवाईकांना अद्दाच्या शरीराचे काही अवयव सापडले. या घटनेनंतर नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली. कोरोना असल्यामुळे लोकं तिच्या घरी सांत्वन करण्यासाठी देखील गेले नाही. लोकांनी ट्वीटरच्यामाध्यमातून आपले दुःख व्यक्त केले. याच वर्षी अद्दाच्या आजीचे निधन झाले होते. वन्य प्राण्यांच्या मानवांमध्ये येण्याच्या घटनांबाबत जिल्हा प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.


हेही वाचा – बिबट्याच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार


- Advertisement -

 

 

- Advertisement -