घरदेश-विदेशहिमाचलमध्ये ढगफुटी, नद्यांना पूर

हिमाचलमध्ये ढगफुटी, नद्यांना पूर

Subscribe

हिमाचलमध्ये ढगफुटी, नद्यांना पूर

हिमाचलमध्ये पावसाचे रौद्र रुप दिसून आले. हिमाचलच्या धर्मशाला येथील भागसू नाग येथे ढगफुटी होऊन प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे छोट्या नाल्यांनीदेखील नदीचे रुप धारण केले. धर्मशालाच्या भागसू नाग येथे नाले ओव्हरफ्लो झाल्याने अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून अनेक वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. ढगफुटीमुळे अनेक हॉटेल्स, तसेच हिमाचलमध्ये आलेल्या पर्यटकांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धर्मशाला परिसरात राहणार्‍या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे ते प्रचंड घाबरले आहेत. भागसू येथे मोठा गोंगाट आणि प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले. येथील अनेक घरांच्या बाहेर मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. घराबाहेर असणारी वाहने देखील पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.

वीज कोसळून ६८ जणांचा मृत्यू

राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यात रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल ६८ हून अधिक जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५० जण जखमी झाले आहेत. राजस्थानच्या जयपूर, झालावाड आणि धौलपूर जिल्ह्यात या वीज दुर्घटना घडल्या आहेत. राजस्थानमधील अजमेर किल्ल्याजवळ सेल्फी घेताना वीज कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. तर उत्तर प्रदेशातील कानपूर, देहात, फहेतपूर, कौशांबी, फिरोजाबाद, उन्नाव, हमीरपूर, सोनभद्र, प्रतापगड हरदोई आणि मिरजापूर येथे वीज कोसळून तब्बल १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याचबरोबर मध्य प्रदेशातीलही वेगवेगळ्या जिल्ह्यात रविवारी वीज कोसळून सात जण दगावले आहेत. उत्तर प्रदेशातील श्योपूर, ग्वाल्हेर, अनूपपूर, बैतुल, शिवपुरी अशा वेगवेगळ्या भागांत मुसळधार पावसासह वीज कोसळल्याने ७ जण दगावले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -