घरदेश-विदेशप्रियकर आणि प्रेयसीच्या चॅट्समुळे १८५ प्रवाशांची उडाली तारांबळ, विमानाला ६ तास उशीर

प्रियकर आणि प्रेयसीच्या चॅट्समुळे १८५ प्रवाशांची उडाली तारांबळ, विमानाला ६ तास उशीर

Subscribe

कर्नाटकातील मंगळुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकर आणि प्रेयसीच्या चॅट्समुळे १८५ प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. या चॅट्समुळे मुंबईला जाणाऱ्या विमानाला ६ तास उशीर झाला. एवढेच नाही तर सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले. त्यांना या विमानात काही स्फोटकं आहेत की नाहीत, याबातची संपूर्ण चौकशी आणि तपासणी करण्यात आली. मुलाच्या फोनमध्ये ‘यू आर बॉम्बर’र असा मेसेज आल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

प्रियकर आणि प्रेयसी आपल्या मोबाईलमध्ये चॅट्स करत बसले होते. परंतु एका प्रवाशाने जवळच बसलेल्या दुसऱ्या प्रवाशाच्या चॅटमध्ये संशयास्पद संदेश पाहिला. यानंतर तो प्रवासी क्रू मेंबर्सकडे तक्रार करण्यासाठी पोहोचला. 14 B या सीटवर बसलेल्या प्रवाशाने पाहिले की, 13 A सीटवर बसलेल्या मुलाच्या फोनमध्ये ‘यू आर बॉम्बर’ असा मेसेज आला आहे. या धक्कादायक मेसेजनंतर संपर्ण विमानाची तपासणी करण्यात आली.

- Advertisement -

तपासणी केल्यानंतर असे निदर्शनास आले की, हा मुलगा मंगळुरूहून मुंबईला जात होता. तर मुलीला बंगळुरूला जायचे होते. दोघेही मित्र होते आणि आपापसात ते सुरक्षेबद्दल गंमत करत होते.

फ्लाइटमध्ये गोंधळ उडाल्यानंतर विमानाला टेक ऑफ करण्यापासून थांबवण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. मात्र, दोघांचीही चौकशी केल्यानंतर विमान सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान मुंबईकडे रवाना झाले.

- Advertisement -

हेही वाचा : मुलुंडमध्ये मोती छाया इमारतीचा स्लॅब कोसळला, 2 जणांचा मृत्यू


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -