घरताज्या घडामोडीFlight Ticket Price Increase : कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने १५ टक्क्यांनी...

Flight Ticket Price Increase : कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने १५ टक्क्यांनी महागणार हवाई प्रवास, ‘या’ मार्गांवर भाडेवाढ

Subscribe

कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने भारतातील विमानांसाठी लागणारे एव्हिएशन टर्बाइन फ्लुएल (ATF) देखील महाग झाले आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात हवाई प्रवास महागणार असून विमान तिकिटांच्या किंमती १५ टक्क्यांनी वाढणार आहेत.

रशिया युक्रेन युद्धानंतर देशातील कच्चा तेलांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलांच्या वाढलेल्या किंमतींचा परिणाम आता विमान उद्योगावरही होताना दिसू लागला आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने भारतातील विमानांसाठी लागणारे एव्हिएशन टर्बाइन फ्लुएल (ATF) देखील महाग झाले आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात हवाई प्रवास महागणार असून विमान तिकिटांच्या किंमती १५ टक्क्यांनी वाढणार आहेत.

रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलांच्या किंमती गगनाला भिडल्या. त्या वेळी ATFची किंमत किलोमीटरच्या पुढे १ लाखांच्या वर गेली होती.याचा परिणाम भारतातील ATF किंमतींवरही पडला आणि ATFच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढल्या. ऑगस्ट २००८मध्ये जेव्हा कच्च्या तेलांच्या किंमती प्रति बॅरल १४७ डॉलर वर पोहोचली होती तेव्हाही भारतातील ATFची किंमत ही ७१,०२८ प्रति किलो लिटर इतकी होती.

- Advertisement -

बुधवारी १६ मार्च रोजी दिल्लीतील तेल वितरण कंपन्यांनी ATFच्या नव्या किंमती जाहीर केल्या असून मार्च महिन्याच्या तुलनेत यात ८६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या मार्गांवरील तिकिटाचे भाडे वाढणार

- Advertisement -

ATFमध्ये वाढ झाल्याने दिल्लीसह मुंबई, दिल्ली- बंगळूरू, दिल्ली – चेन्नई, दिल्ली – हैद्राबाद आणि दिल्ली कोलकत्ता या मार्गावरील तिकिट भाडे वाढू शकते, असे मत उड्डाण उद्योग तज्ञांनी व्यक्त केलं आहे. तर दिल्ली- लखनऊ, दिल्ली – जयपूर या मार्गातील तिकिटाच्या भाड्यांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. या मार्गावरील विमान कंपन्यांनी भाडे वाढवले तर प्रवाशांच्या संख्येवर मोठा परिणाम होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा – The Kashmir Files चित्रपट न पाहणाऱ्यांविरोधात २ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेचा कायदा करायला हवा, यशवंत सिन्हा यांचे वादग्रस्त ट्विट

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -