Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी फ्लिपकार्टकडून ४५०० कर्मचाऱ्यांच्या इनक्रिमेंटला कात्री

फ्लिपकार्टकडून ४५०० कर्मचाऱ्यांच्या इनक्रिमेंटला कात्री

Subscribe

जगभरात मंदीचे सावट असल्याने मागील अनेक महिन्यांपासून बड्या कंपन्यांना कर्मचारी कपातीला सुरूवात केली आहे. त्यामुळे लाखोहून अधिक कर्मचाऱ्यांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. अशातच आता फ्लिपकार्टनेही आपल्या कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

जगभरात मंदीचे सावट असल्याने मागील अनेक महिन्यांपासून बड्या कंपन्यांना कर्मचारी कपातीला सुरूवात केली आहे. त्यामुळे लाखोहून अधिक कर्मचाऱ्यांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. अशातच आता फ्लिपकार्टनेही आपल्या कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, फ्लिपकार्ट ३० टक्के म्हणजे ४५०० कर्मचाऱ्यांचे इन्क्रिमेंट थांबवणार आहे. शिवाय, फेसबूकची मुळ कंपनी असलेल्या मेटानेही पुन्हा एकदा कर्मचारी कपातीचा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्टमध्ये अंदाजे १५ हजार कॉर्पोरेट कर्मचारी आहेत. यापैकी फ्लिपकार्ट ३० टक्के म्हणजे ४५०० कर्मचाऱ्यांचे इन्क्रिमेंट थांबवणार आहे. याबाबत एका पत्राद्वारे कंपनीने माहिती दिली आहे. या पत्रात ग्रेड १० आणि त्यावरील फळीतील वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यात येणार नाही. त्यांची संख्या अंदाजे ४५०० आहे.

- Advertisement -

फ्लिपकार्टमध्ये सप्लाय चेन आणि वेअरहाऊसिंगसाठी इतर एजन्सीचे अंदाजे २ लाख कर्मचारी कारम करतात. मात्र हा नवा नियम त्यांच्यासाठी लागू होणार नाही. दरम्यान, रोख वाचवण्यासाठी कंपनीचा प्रयत्न आहे. (flipkart will stop increment of 4500 workers meta announces big layoffs again this year)

मेटाकडून पुन्हा कर्मचारी कपातीचा इशारा

- Advertisement -

फेसबूकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाने गतवर्षी ११ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली होती. आता पुन्हा एकदा हजारो लोकांना कामावरुन कमी करण्याची तयारी सुरु केली आहे. रॉयटर्सनुसार, मेटा जागतिक आर्थिक मंदीमुळे अतिरिक्त खर्च वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. गतवर्षी मेटाने कंपनीतून अंदाजे १३ टक्के म्हणजे ११००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले होते.


हेही वाचा – रशिया आणि युक्रेन युद्धासंदर्भात संयुक्त राष्ट्रात ठराव मंजूर, भारतासह 32 देश राहिले दूर

- Advertisment -