घरदेश-विदेशपाकिस्तानात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण; ५९ जणांचा मृत्यू

पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण; ५९ जणांचा मृत्यू

Subscribe

पाकिस्तानात मुसळधार पावासामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरस्थितीमुळे पाकिस्तानात आतापर्यंत ५९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. तसेच, पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

पाकिस्तानात मुसळधार पावासामुळे (Heavy Rainfall) पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरस्थितीमुळे पाकिस्तानात (Pakistan) आतापर्यंत ५९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. तसेच, पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. शिवाय जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. जवळपास १०० हून अधिक घरे बेघर झाली आहेत. (flood in Pakistan due to heavy rainfall 59 dead and hundreds left homeless)

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील बलुचिस्तानच्या दक्षिणेकडील प्रांतात पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने महिला आणि मुलांसह ५९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात मुसळधार पाऊस पडत आहे.

- Advertisement -

पाकिस्तानातील सर्वात मोठे शहर असलेल्या कराचीमध्ये पाणी साचले आहे. दरम्यान, नौदलाने सांगितले की ते नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि बलुचिस्तानला रेशन आणि ताजे पाणी पुरवण्याचे प्रयत्न करत आहेत. उत्तर-पश्चिम खैबर पख्तुनख्वा प्रांतात पावसामुळे घर कोसळून एका सहा वर्षाच्या मुलासह दोन जणांचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाल्याची माहिती जिल्हा अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, याआधी २०१० मध्ये पाकिस्तानला सर्वात भीषण पुराचा फटका बसला होता, ज्यामुळे २० दशलक्ष लोक प्रभावित झाले होते. अब्जावधी डॉलर्सच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आणि देशाचा एक पंचमांश भाग पाण्याखाली गेला.

- Advertisement -

हेही वाचा – पंढरीआधी दिल्लीवारी ! मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या भेटीला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -